वाश्गिंटन : डॉक्टर हे देवासारखे असतात, असे म्हटले जाते. कारण ते रुग्णांना जीवनदान देतात. सर्वोतोपरी रूग्णाचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न करतात. पण एखाद्या रुग्णाला वाचवावे की मरू द्यावे, अशा संभ्रमात डॉक्टर असल्याचे कधी ऐकले आहे ? ऐकायलाही अजब वाटणारी घटना प्रत्यक्षात घडली आहे. 


काय आहे हा प्रकार ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यात हा प्रकार घडला आहे. फ्लोरिडातील एका हॉस्पिटलमध्ये एका बेशुद्ध रूग्णावर उपचार करताना त्यांची द्विधा मनःस्थिती झाली. त्यासाठी कारण ठरला. रूग्णाच्या छातीवरील टॅटू. त्याच्या छातीवर लिहीले होते, do not resuscitate. म्हणजे परत जिवंत करू नका. यावरून त्या व्यक्तीला जगण्याची इच्छा नसल्याचे कळते. त्याच्या जीवन संपवण्याच्या इच्छेमुळे डॉक्टर संभ्रमात सापडले.


द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनरला डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या ७० वर्षीय रुग्णाला श्वासासंबंधित आजार आणि इतर अन्य समस्या असल्यामुळे जॅक्सन मेमोरियल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते.


इच्छेचा सन्मान 


सुरवातीला उपचार करण्यासाठी सरसावलेल्या डॉक्टर छातीवरील टॅटू पाहून संभ्रमात पडले. कदाचित स्वतःची इच्छा पुर्ण करण्यासाठी त्याने हे पाऊल उचलले असावे, असा डॉक्टरांनी विचार केला. डॉक्टरांनी त्याच्या छातीवर टॅटू गोंदवणाऱ्या व्यक्तीशी देखील बातचीत केली. 


त्याने डॉक्टरांना विनंती केली की. रूग्णाच्या इच्छेचा सन्मान केला जावा. डॉक्टरांनी विनंती मान्य केली आणि त्याच रात्री त्या रूग्णाचा मृत्यू झाला.