नवी दिल्ली : जंक फूडचे शौकीन असणारे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची भलतीच गोची झाली आहे. आपल्याला जंक फूड किती आवडते हे ट्रम्प यांनी जाहीरपणे अनेकदा सांगितले आहे. 'फायर अॅण्ड फ्यूरी:इनसाईड द ट्रम्प व्हाईट हाऊस' या पुस्तकातही याची चर्चा करण्यात आली आहे. पण, आपल्या आवडत्या खाद्यपदार्थांपासून ट्रम्प यांना दूर रहावे लागणार आहे.


अन्नपदार्थातातून विषप्रयोग केला जाऊ शकतो


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'फायर अॅण्ड फ्यूरी:इनसाईड द ट्रम्प व्हाईट हाऊस' या पुस्तकात गॉसिप करताना म्हटले आहे की, ट्रम्प यांच्या आहाराबाबत अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. कारण त्यांच्यावर अन्नपदार्थातातून विषप्रयोग केला जाऊ शकतो. असे असले तरी, ट्रम्प हे नेहमी त्यांचे आवडते बिफ आणि बर्गर खात असत. त्यांना मॅकडोनाल्डची उत्पादने फार अवडत असत. त्यामुळे ते नेहमीच त्याचा अस्वाद घेत. मात्र, आता त्यांच्या या अहारावार डॉक्टरांनीच मर्यादा घालून दिल्या आहेत. आरोग्याच्या दृष्टीने हा अहार घातक असल्याचे त्यांच्या डॉक्टरांनी म्हटले आहे.


ट्रम्प यांचे वजन तब्बल १०९ किलो


प्राप्त माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांची उंची ६ फूट ३ इंच इतकी असून, सध्या त्यांचे वजन तब्बल १०९ किलो इतके आहे. अतिलठ्ठ व्यक्तिंच्या कक्षेत येण्यासाठी ट्रम्प यांचे वजन एका पौंडानेच कमी आहे. हे एक पौंड भरून निघाल्यास ट्रम्प हे अतिलठ्ठ व्यक्ती म्हणून ओळखले जाऊ शकतात. 


ट्रम्प यांच्या आरोग्याची जबाबदारी असलेले डॉक्टर रियर अॅडमिरल रॉनी जॅक्सन यांनी ट्रम्प यांना अहारावर बंधने घालून दिली आहे. जॅक्सन यांनी ट्रम्प यांना अत्यंत साधा अहार घेण्यास सांगितले आहे.