व्यायामातही दिसतोय कुत्र्याचा प्रामाणिकपणा...
अनेकांना व्यायामाचा कंटाळा येतो.
मुंबई : अनेकांना व्यायामाचा कंटाळा येतो. सुरुवातीला अगदी उत्साहाने जिममध्ये अॅडमिशन घेणाऱ्या अनेकांचा उत्साह कालांतराने मावळतो आणि पुन्हा 'जैसे थे' परिस्थिती निर्माण होते. त्यात अनेक सबबी पुढे येतात. त्यातील एक म्हणजे व्यायामाला सोबत कोणी पार्टनर नाही. आणि हे काही प्रमाणात खरे देखील आहे. एकमेकांशी गप्पा मारत, एकमेकांना प्रोत्साहन देत व्यायाम काहीसा सहज होतो. पण, मित्र-मैत्रीण ऐवजी हा पार्टनर दुसरा कोणी असू शकतो असा तुम्ही कधी विचारही केला नसेल. पण एका बाईचा व्यायामासाठी पार्टनर आहे चक्क तिचा कुत्रा. तुम्हाला खरे वाटत नसेल तर पहा हा व्हिडीओ.
सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून तुम्हाला याची प्रचिती येईल. या व्हिडिओत मालकीण आणि तिचा कुत्रा एकमेकांशी उत्तमप्रकारे समन्वय साधताना व्यायाम करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे काही व्यायामप्रकार करण्यात हा कुत्रा आपल्या मालकीणीला अतिशय चांगल्या पद्धतीने मदत करत आहे. यामध्ये योग करण्यासाठी चटई आणण्यापासून ते सर्व व्यायामप्रकार कुत्रा सराईतपणे करत आहे. कुत्र्याच्या ही व्यायामाची पद्धत पाहून फार गंमत वाटते.