viral video - डान्स करायला सर्वांनाच आवडतं. गाणं सुरु झालं की अनेकांचे पाय गाण्यावर थिरकतात. तुम्ही माशाला कधी डान्स करताना पाहिलं आहे का? तुम्ही डॉल्फिन पाहिला आहे का? काही लोकांनी तो प्रत्यक्षात पाहिला आहे तर कुणी डॉल्फिनचे व्हीडीओ पाहिले असतील. डॉल्फिनला सोशल मीडियावर पाण्यात खेळताना किंवा समुद्रात उंच झेप घेत उडी मारताना पाहिलं असेल. आज आम्ही तुम्हाला एक खास व्हिडीओ दाखवणार आहोत, ज्यात डॉल्फिन डान्स करत आहे. हो, बरोबर डॉल्फिन डान्स करतेय.


डॉल्फिनची खासियत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. डॉल्फिन हा बुद्धीमान प्राणी आहे असं म्हणतात. तो माणसांची हुबेहुबे नक्कल करण्यात माहीर असतो, अंसही म्हटलं जातं.  तसंच डॉल्फिन या माशाची एक खासयित तुम्हाला माहिती आहे का?


डॉल्फिन ही पाण्यात श्वास घेऊ शकत नाही. त्यामुळे तिला श्वास घेण्यासाठी पाण्याबाहेर यावं लागतं. म्हणून अनेक वेळा आपल्याला डॉल्फिन पाण्याबाहेर दिसते. विशेष म्हणजे दोन डॉल्फिन एकमेकांना 20-25 वर्षांनी भेटली तरी त्यांना सगळंच आठवत असतं. तर डॉल्फिनमधील सगळ्यात खास खासयित म्हणजे ती माणसांपेक्षा 10 पट जास्त ऐकू शकतं.


पाहिली का अशी डॉल्फिन?


परदेशात डॉल्फिनचे खेळ आणि डान्सचे शो आयोजत केले जातात. असाच एका शोमध्ये प्रेक्षकाने आपल्या मोबाईलमध्ये डॉल्फिनचा डान्स कैद केला. डॉल्फिनचा हा डान्स सध्या सोशल मीडियावर खूप पाहिला जातो.



पाहिलं का, कही डॉल्फिन कशी मस्त पाण्याबाहेर येऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय.  तिचा हा गोल गोल असा अनोखा डान्स प्रेक्षक आपल्या आपल्या कॅमेरात कैद करताना दिसत आहे. हा व्हीडीओ आतापर्यंत 1 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. तर असंख्य लोकांनी तो लाईक केला आहे.  आपणही डॉल्फिनचा हा डान्स बघून नक्कीच दंग व्हाल. हा व्हिडीओ सोशल मीडियाचा इंस्टाग्रामच्या superitemsworld या आयडीवरुन शेअर करण्यात आला आहे.