वॉशंग्टन : अमेरिका राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प २०१७ चे आपल्या वेतनाचा चौथा हिस्सा देशातील पायाभूत सुविधा निर्माणासाठी परिवहन विभागाला देत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिका परिवहन मंत्री एलेन चाओ यांना राष्ट्राध्यक्षांकडून १ लाख अमेरिकी डॉलर्सचा चेक मिळालाय.


घोषणा 


 ढासळलेले पुल, रस्ते आणि पोर्ट्सच्या पुनरनिर्माण योजनेची घोषणा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ट्रम्प यांनी पगारातील चौथा हिस्सा देण्याचे घोषित केले. 


याआधीही 'पगार दान'


हा निधी पायाभूत सुविधांसाठी वापरण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्रालयातर्फे सांगण्यात आले.


राष्ट्राध्यक्षांनी याआधी आपल्या पगारातील रक्कम आरोग्य आणि मानव सेवा विभाग, राष्ट्रीय उद्यान सेवा आणि शिक्षण विभागालादेखील दिली आहे. 


४ लाख डॉलर पगार 


 मी पगार घेणार नसल्याचे त्यांनी निवडणुकीआधी जाहीर केले होते. त्यांचा पगार प्रतिवर्ष ४ लाख डॉलर इतका आहे.


कायद्यानुसार पगार घेणं बंधनकारक असल्याने ते आपल्या पगारातील रक्कम दान करत आहेत.