वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सूनेनं पतीपासून घटस्फोट मिळण्यासाठी अर्ज केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर आणि त्याची पत्नी वेनेसा ट्रम्प लवकरच घटस्फोट  घेऊन त्यांचा बारा वर्षांचा संसार संपवणार आहेत. वेनेसानं पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी गुरुवारी तिनं पब्लिक कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दिलाय. ज्युनिअर ट्रम्प आणि वेनेसाला पाच मुलं आहेत.


ज्युनिअर ट्रम्प 'ट्रम्प ऑर्गनायझेशन'मध्ये कार्यकारी अधिकारी आहेत... तर वेनेसा ट्रम्प ही प्रथितयश मॉडेल आहे. 


ज्युनिअर ट्रम्प आणि वेनेसा यांनी २००५ मध्ये विवाह केला होता. या दोघांचं लग्न झालं त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प राजकारणात सक्रिय नव्हते... तरीही या दोघांचं लग्न  अमेरिकेत प्रचंड गाजलं होतं.