कोरोना संकटात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सुरु करणार निवडणुकीचा प्रचार
अमेरिकेत कोरोना विषाणूचा कहर कायम आहे
मुंबई : अमेरिकेत कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. देशात दररोज पंधरा हजारहून अधिक रुग्ण वाढत आहेत. इथल्या एकूण प्रकरणांची संख्या २० लाखांच्या वर गेली आहे. एक लाख 12 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे की या महिन्यापासून ते आपली निवडणूक सभा सुरू करणार आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले की ते सुरुवातीला टेक्सास, फ्लोरिडा, रिझोना आणि उत्तर कॅरोलिना येथे निवडणूक बैठका घेतील. यावर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार असून 3 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
कोरोना विषाणूच्या संकटामुळे गेल्या तीन महिन्यांपासून निवडणूक रॅली बंद आहेत. परंतु आता डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा त्याला सुरुवात करणार आहेत. पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार असणार आहेत, जुलैमध्ये याची अधिकृत घोषणा होईल. दुसरीकडे डेमोक्रॅट्स पक्षाचे उमेदवार असलेले बिडेन यांनी उमेदवाराला पाहिजे तितकी मते मिळविली आहेत.
डेमोक्रॅट्सच्या अधिवेशनात याची घोषणा केली जाईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जाहीर केले की त्यांच्या सभेचा विषय पुन्हा एकदा मेक अमेरिका ग्रेट अगेन असेल.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने अमेरिकेतील कोरोना संकटाशी ज्या प्रकारे सामना केला. त्यामुळे लोकं नाराज आहेत. तसेच जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूच्या निषेधानंतर गेल्या काही सर्वेक्षणात डोनाल्ड ट्रम्प यांची जादू कमी झाली आहे.