नवी दिल्ली : कोरोनामुळे अमेरिकेवर संकट ओढावलं आहे. त्यामुळे चीन आणि अमेरिकेत संबंध बिघडताना दिसत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असा इशारा दिला आहे की, जर चीन तरतुदींचे पालन करीत नसेल तर ते त्याबरोबरचा व्यापार करार संपुष्टात आणतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रम्प म्हणाले की, त्यांच्यापेक्षा कोणीही चीनप्रती कठोर असू शकत नाही. विशेष म्हणजे चीनमधून उद्भवणार्‍या कोरोना विषाणूच्या साथीसंदर्भात दोन्ही देशांच्या नेत्यांकडून वक्तव्य होत आहेत. अमेरिका कोरोनाचा व्हायरस चीनमधील कोणत्या तरी प्रयोगशाळेतून सोडण्यात आला आहे का याबद्दल शंका उपस्थित होत आहे. अध्यक्ष ट्रम्प यांनी अनेकदा याला 'चिनी व्हायरस' म्हटले आहे.


चीनमध्ये कोरोना विषाणूची 82,788 लोकांना लागण झाली आणि 4632 लोकांचा मृत्यू झाला. तर अमेरिकेत 8,24,600 जणांना कोरोनाची लागण झाली असून 45 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा सर्वात मोठा परिणाम अमेरिकेवर झाला आहे.


चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यावर यावर्षी जानेवारीत स्वाक्षरी झाली होती. गेल्या दोन वर्षांपासून ट्रेड वॉरची कटुता विसरून दोन्ही देशांनी या करारास सहमती दर्शविली होती. दोन वर्षांपासून दोन्ही देशांमधील ट्रेडवॉरमुळे जगातील शेअर बाजार आणि अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले.


वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, या करारामध्ये असे म्हटले गेले होते की, चीन 200 अब्ज डॉलर्सची अमेरिकन उत्पादने खरेदी करेल. पण यूएस-चाइना इकोनॉमिक अँड सिक्योरिटी रीव्यू कमीशनने आपल्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, 'चीन यामध्ये एक नवीन अट टाकू शकतो की, नैसर्गिक संकट किंवा असामान्य परिस्थितीमध्ये पुन्हा चर्चा केली जाईल.'