महिला पत्रकारावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भडकले, प्रश्न विचारल्यावर म्हणाले...
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप हे एका महिला पत्रकारावर भडकले, या महिला पत्रकाराला हळू बोला,
न्यू यॉर्क : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप हे एका महिला पत्रकारावर भडकले, या महिला पत्रकाराला हळू बोला, असं देखील ट्रंम्प म्हणाले. रविवारी एका पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प सीबीएसच्या महिला रिपोर्टर वेईजिया जियांग यांच्यावर काही प्रश्न विचारल्याने भडकले.
महिला पत्रकार जियांग यांनी आधी ट्रम्प यांना विचारलं, कोरोना या साथीच्या आजाराचा फैलाव वेगाने होत असताना, तुम्ही फ्रेब्रुवारीमध्ये रॅलिज का केल्या, तसेच अर्धा मार्च महिना उलटला तरी सोशल डिस्टेंसिंग लागू करण्यास वेळ का झाला?
यावर ट्रम्प भडकले आणि महिला पत्रकाराला उलट प्रश्न विचारत म्हणाले, तुम्ही नेमकं काम कुणासाठी करता?
ट्रम्प त्या महिला पत्रकाराला म्हणाले, तुम्ही कुणासोबत आहात, हो तुम्ही कुणासोबत आहात? यानंतर त्यांनी जानेवारी महिन्याच्या शेवटी चीनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी लावली होती, त्याविषयी सांगितलं.
अमेरिकेने २ फेब्रुवारीपासून चीनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी लावली होती.
महिला पत्रकार जियांग जेव्हा म्हणाल्या, फक्त चीनच्या नागरिकांवर बंदी लावली होती, चीनमधून येणाऱ्या अमेरिकी नागरिकांवर नाही, जे तेथून आपल्यासोबत व्हायरस आणत होते.
तेव्हा ट्रम्प थांबले आणि म्हणाले, जरा सावकाश, जरा संयम ठेवा, आम्ही असं केलं आणि लोक आमच्या निर्णयावर आनंदी होते, सर्व लोक निर्णयाशी सहमत होते.
ट्रम्प यांनी महिला पत्रकाराला सांगितल की, त्यांनी याविषयी अभ्यास नीट केलेला दिसत नाही.
ट्रम्प जेव्हा म्हणाले, जेव्हा मी बंदी लावली होती, तेव्हा अमेरिकेत व्हायरसची किती प्रकरणं होती, किती संख्या होती माहितीय का, जेव्हा त्यांना नाही असं उत्तर मिळालं तेव्हा ट्रम्प म्हणाले, तुम्ही यावर नीट अभ्यास केला पाहिजे.
जेव्हा महिला पत्रकार जियांग यांनी यावर उत्तर देण्यास सुरूवात केली तेव्हा, ट्रम्प म्हणाले, कृपा करून तुमचा आवाज कमी करा, हळू बोला.
यावर आणखी पुढे बोलताना, ट्रम्प म्हणाले, जेव्हा आम्ही चीनहून येणाऱ्या विमानांवर बंदी लावली तेव्हा एकही मृत्यू अमेरिकेत कोरोनाने झाला नव्हता. तेव्हा जियांग म्हणाल्या, चांगल्या निर्णयासाठी खूप खूप धन्यवाद.
अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत ४२ हजार ८९७ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ७ लाख ९९ हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.