इस्लामिक राष्ट्रांकडून भारतीय मुस्लिमांवर केलं जाणारं वक्तव्य आणि टीप्पणी ही काही नवी बाब नाही. इराणी नेतेही यात मागे नसून, आता स्वतःला प्रेषित पैगंबर यांचा दूत म्हणवणाऱ्या, इराणी सुप्रीम लिडर अली खामेनेईने, परत एकदा भारतीय मुस्लीमांवरून चिथावणीखोर वक्तव्य केलं आहे. ज्या वक्तव्यास भारताकडूनही तोडीस तोड उत्तर देण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नक्की काय म्हणाले इराणचे सर्वोच्च नेते?
इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई याने परत एकदा भारताविरुद्ध वक्तव्य केले आहे. अल्पसंख्यांकांची स्थिती या बाबत खामेनेई यांनी विष पेरण्याचा प्रयत्न केला. आयतुल्लाह खामेनेई यांने सोमवारी तेहरानमध्ये झालेल्या, मौलविंच्या बैठकीत गाझा, म्यानमार आणि भारतातवर विवादात्मक वक्तव्य केले. भारतातील मुसलमान पिडित आहेत आणि त्यांना त्यासाठी फार वाईट वाटतं असे त्यांनी सांगितले. जर आपण भारत, म्यानमार आणि गाझा मधील मुस्लिमांची व्यथा समजून नाही घेतली, तर आपण स्वतःला मुस्लिम म्हणवू शकत नाही, असंही ते म्हणाले.  


आधीसुद्धा भारतविरुद्ध बोलले होते खामेनेई 
या आधीसुद्धा 2020 साली, दिल्लीत झालेल्या तणावाच्या परिस्थितीवर खामेनेई यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. भारतात मुस्लिमांचा नरसंहार होत आहे. जगभरातील मुस्लीम भारतीय मुस्लिमांनबरोबर आहेत. भारत सरकारने कट्टर हिंदूंविरुद्ध ठोस पावले उचलली पाहिजेत, असं चिथावणीखोर वक्तव्य त्यांनी केलं होतं. 2019 मध्ये काश्मीर मुद्द्यावरही खामेनेईंनी भाष्य केले होते.  अनुच्छेद 370 हटवल्यानंतर, काश्मीरमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचारांना थांबवण्यासाठी, सरकारने काहीतरी करावे असे ते म्हणाले होते. 2017 ला जम्मू-काश्मीरची तुलना गाझा, यमनशी केली होती. 


रणधीर जैसवालांचे उत्तर 
खामेनेई यांच्या सततच्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर, भारतीय विदेशमंत्री प्रवक्ते रणधीर जैसवाल यांनी, त्यांना सडेतोड उत्तर देत , दुसऱ्यांच्या प्रकरणांत डोकावण्याआधी स्वतःचा इतिहास पडताळून बघा ,असा सल्ला दिला. खामनोईंच्या वक्तव्यात काडीमात्रही तथ्य नाही आणि भारताला हे मान्य नाही असं म्हणत , तुमच्या टिप्पण्यांचा आम्ही विरोध करतो, आधी स्वतःचे रेकॉर्ड बघा, या शब्दात जैसवाल यांनी खामनेईंचा आरोप मोडीत काढला .