Doomsday clock 2025: विश्वात उत्पत्ती होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा शेवट अटळ असतो हा निसर्गाचाच नियम आहे. या पृथ्वीचा किंबहुना मानवाचाही अंत अटळ असून, याविषयीचे कैक सिद्धांत आतापर्यंत मांडण्यात आले आहेत. जाणून हैराण व्हाल, पण जगभरात प्रलय नेमका केव्हा येणार, जगाचा विध्वंस केव्हा होणार यासाठीची वेळही निश्चित असल्याचं म्हटलं जातं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगभरातील निष्णात वैज्ञानिक एकत्र येऊन दरवर्षी याच धर्तीवर पृथ्वीच्या अंताविषयीचे काही सिद्धांत मांडतात. सोप्या भाषेत सांगावं तर, विश्वाच्या विनाशाची वेळ ठरवतात. एका घड्याच्या आधारे हे निर्धारित केलं जातं, 'डूम्सडे क्लॉक' असं या घड्याळाचं नाव. 'प्रलयाचं घड्याळ' अशीही या घड्याळाची ओळख. 


यावेळी पहिल्यांदाच मंगळवारी म्हणजेच 28 जानेवारी रोजी मध्यरात्री 89 सेकंदांपूर्वी रिसेट करण्यात आलं आणि 78 वर्षांमध्ये असं काहीतरीह पहिल्यांदाज घडलं. याचाच तर्क लावत मानव स्वत:च्याच विनाशाच्या अतिशय जवळ आहे असं वैज्ञानिकांनी स्पष्ट केलं. 


सहकारी वृत्तसंस्था wion च्या माहितीनुसार अण्वस्त्र, जलवायू आणि प्राद्योगिकी क्षेत्रातील काही तज्ज्ञांनी एकत्र येत मंगळवारी हे घड्याळ मध्यरात्रीच्या अतिशय नजीक असल्याची अधिकृत घोषणा केली. या प्रतिकात्मक घड्याळानं मानव प्रजाती स्वरचित प्रगतीसह स्वत:ला नष्ट करण्याच्या नेमकी किती जवळ आहे हेच सूचित केल्याचं म्हटलं जात आहे. 


घड्याळाच्या कार्यपद्धतीविषयी तज्ज्ञ म्हणाले... 


बुलेटिनच्या विज्ञान व संरक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी असणाऱ्या डॅनिअल होल्ज यांनी यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, 'आम्ही हे घड्याळ मध्यरात्रीच्या जवळपास सेट केलं. कारण आम्हाला नैसर्गिक बदल, अण्वस्त्र युद्धाचा धोका आणि औद्योगिक क्षेत्रात होणारी प्रगती पाहता मानवी अस्तित्वासाठी या गोष्टी सकारात्मक वाटत नाही.'


हेसुद्धा वाचा : Mumbai News : गिया बार्रेचा धोका पाहता BMC किती सज्ज? नागरिकांनो या बातमीकडे अजिबात दुर्लक्ष नको 


 


वैज्ञानिकांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर एका भयावह संकटापासून आपण नेमके किती जवळ आहोत आणि योग्य मार्गाचा अवलंब न केल्याच नेमकी किती भीषण पस्थिती उद्भवू शकते हेच अधोरेखित होत आहे. 


'कोणत्याही क्षणी होणार अणुयुद्ध'?


वरील निरीक्षणादरम्यान कोणत्याही क्षणी अणुयुद्ध होणार असल्याचा इशारा देत युक्रेन युद्धालाच अणुयुद्धाचं स्वरुप प्राप्त होऊ शकतं असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला. फक्त अणुयुद्धच नव्हे, तर जागतिक तापमानवाढ, यंत्रणांचं या समस्येकडे होणारं दुर्लक्ष या कैक कारणांमुळं जगाता अंत होणार असल्याचं या निरीक्षणातून नव्यानं स्पष्ट करण्यात आलं.