DoomsDay Clock: यंदाच्या वर्षात म्हणजेच 2023 मध्ये जगाचा विनाश (destruction of the world) अटळ आहे. 2023 मध्येच जगाचा अंत होईल, अशी भीती वैज्ञानिकांनी वर्तवली आहेत. या भीतीमागे आहे एक मोठं भाकित आहे. ते म्हणजे अमेरिकेतील 'डूम्स डे क्लॉक'. डूम्स डे क्लॉकच्या (DoomsDay Clock) इशाऱ्यानुसार पृथ्वीचा अंत जवळ आला आहे. त्यामुळे आता जगाचं टेन्शन वाढलंय. (DoomsDay Clock Shows 90 Seconds To Midnight Is The World Close To Its End marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कदाचित पृथ्वी फिरायची थांबून प्रलय येईल किंवा परमाणु युद्धात जगाचा विनाश (End of the World) होईल असा इशारा वैज्ञानिकांनी दिलाय. या इशाऱ्यामागे आहे डूम्स डे क्लॉकने दाखवलेली वेळ. या क्लॉकमध्ये सध्या मध्यरात्रीचे 12 वाजायला फक्त 90 सेकंद बाकी (DoomsDay Clock Shows 90 Seconds To Midnight) आहेत आणि त्यामुळे जगभरातल्या वैज्ञानिकांमध्ये घबराहट पसरलीय. डूम्स डे क्लॉक काय आहे, या घड्याळातील वेळेचा आणि पृथ्वीच्या विनाशाचा काय संबंध आहे? असा सवाल अनेकांना पडला आहे.


'डूम्स डे क्लॉक' म्हणजे काय?


डूम्स डे क्लॉक हे एक सांकेतिक घड्याळ (Symbolic Clock) आहे. 1945 मध्ये हिरोशिमा-नागासकी विध्वंसानंतर या घड्याळाची निर्मिती करण्यात आली. या घडाळ्यात रात्रीचे 12 वाजले तर जगाचा विनाश होईल असं मानलं जातं. मध्यरात्री 12 वाजण्याच्या जितकं जवळ हे घड्याळ जाईल तितका अंत जवळ आला असं मानलं जातं.


जगात घडणाऱ्या विध्वंसक घटनांमुळे या घड्याळाचा काटा पुढे सरकतो. 1991 मध्ये रात्रीचे 12 वाजायला फक्त 17 मिनिटं बाकी होती. 2023 मध्ये 12 वाजण्यासाठी फक्त 90 सेकंद बाकी आहेत. म्हणजे जगाच्या अंतापासून आपण फक्त 90 सेकंद मागे आहोत, असं संकेत दिले जात आहेत.


आणखी वाचा - Earth Secrets: महाप्रलयाचे संकेत? आजपासून इतक्या दिवसांनी पृथ्वी उलट्या दिशेने फिरणार?


दरम्यान, डूम्स डे क्लॉक एक सांकेतिक किंवा प्रतिकात्मक घड्याळ आहे. मात्र जगात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांनुसार त्यातली वेळ बदलते. मध्यरात्रीचे 12 वाजले तर संपूर्ण मानवजातीचेच 12 वाजतील, विनाश होईल असं मानलं जातं. आता रात्रीचे 12 वाजायला फक्त 90 सेकंद बाकी आहेत. त्यामुळे डूम्स डे क्लॉक चर्चेचा (DoomsDay Clock) विषय ठरलंय.