UAE Abu Dhabi Drone Attack :संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये मोठा हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अबुधाबीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Abu Dhabi Airport) सोमवारी दोन स्फोट झाले. ड्रोनच्या (Drone Attack) माध्यमातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. स्फोटांनंतर विमानतळावरही आगीचे लोळ दिसून आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्फोटानंतर तीन टँकरनी पेट घेतला असून ड्रोनद्वारे हल्ला करून हा स्फोट घडवण्यात आला असावा, असा अंदाज विमानतळ प्राधिकरणानं वर्तवला आहे. 


येमेनमधील हौथी बंडखोरांनी (Yemens Houthi Rebels) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. विमानतळाच्या बांधकाम सुरू असलेल्या एक्स्टेन्शनजवळ हा स्फोट झाल्यानं तो फारसा गंभीर नसल्याचं समजतंय. आबुधाबी पोलिसांनी घटनेची चौकशी सुरू केली आहे.


UAE मधील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनी (ADNOC) च्या पेट्रोल वाहून नेणाऱ्या टँकरमध्ये विमानतळावर हा स्फोट झाला.  स्फोट होण्यापूर्वी आकाशात ड्रोनसारखी आकृती दिसली होती असं स्थानिक माध्यमांनी म्हटलं आहे. विमानतळावरील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस आणि अधिकाऱ्यांचे पथक पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आलं.