दारुच्या नशेत फिरला ३ देश, कॅबचं बिल पाहून बसला झटका
अनेकदा दारुच्या नशेत लोक काहीतरी विचित्र काम करतात आणि आपण काय करत आहोत याचा त्यांना अंदाजही नसतो. असाच काहीसा प्रकार नॉर्वेत राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत घडला आहे.
नवी दिल्ली : अनेकदा दारुच्या नशेत लोक काहीतरी विचित्र काम करतात आणि आपण काय करत आहोत याचा त्यांना अंदाजही नसतो. असाच काहीसा प्रकार नॉर्वेत राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत घडला आहे.
नॉर्वेत राहणारा एक व्यक्ती थर्टी फर्स्ट आणि नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाला. त्याने सेलिब्रेशन दरम्यान इतकी दारु प्यायला की त्याला शुद्धच राहीली नाही.
दारुच्या नशेत त्याने टॅक्सी पकडली आणि चक्क कारमधूनच त्याने तीन देशांची सैर केली. पाहूयात काय आहे हा प्रकार...
मिळालेल्या माहितीनुसार, नॉर्वेमध्ये राहणारा हा व्यक्ती डेनमार्कची राजधानी कोपनहेगनमध्ये ३१ डिसेंबरच्या रात्री सेलिब्रेशन करत होता. पार्टी करताना त्याने दारु प्यायली आणि त्यानंतर घरी जाण्यासाठी कॅब बूक केली.
कॅब बुक करणं काही वेगळी गोष्ट नाहीये पण तो हे विसरला होता की त्याचं घर घटनास्थळापासून ६०० किलोमीटर दूर नॉर्वेची राजधानी ओस्लोमध्ये आहे. या प्रवासा दरम्यान त्याने तीन देशांची सैरही केली. ज्यामध्ये डेनमार्क, स्विडन आणि नॉर्वेचा समावेश आहे.
यानंतर घरी पोहोचल्यावर त्याने टॅक्सीचं बिल पाहीलं तर त्यालाही धक्काच बसला. कारण, टॅक्सीचं बिल २२०० डॉलर म्हणजेच जवळपास १ लाख ३९ हजार रुपये झालं होतं. त्याने हे बिल भरण्यास नकार दिला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी हा व्यक्ती आपल्या घरी पोहोचला त्यावेळी तो घरात गेला आणि झोपला. त्यानंतर टॅक्सी ड्रायव्हरने पोलिसांची मदत मागितली. पोलिसांनी आपला इंगा दाखवल्यानंतर नशेत असलेल्या या व्यक्तीने १८०० नॉर्वेजियन क्रोनचं बिल भरण्यास तयारी दाखवली.