मुंबई : दुबईतील सर्वात मोठी एअरलाइन कंपनी एमिरेट्सने महत्वाचा निर्णय घेतला आहे. फ्लाइट्समध्ये 'हिंदू मील' आता उपलब्ध होणार नाही. कंपनीने आपल्या मेन्यूतून याला हटवण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय विमानात प्रवाशांची धार्मिक आस्था लक्षात घेऊन अन्न बुक करण्याची व्यवस्था खूप प्रचलित आहे. विमानात प्रवास करण्या अगोदर तुम्ही आवश्यक ते जेवण बुक करू शकता. मात्र एमिरेट्स फ्लाइटमध्ये आता ही सेवा मिळणार नाही. 


आऊटलेट्स पोहोचवणार विमानात जेवणं 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विमानात हिंदू मीलला बंदी केल्यानंतर प्रवाशांना आऊटलेट्सच्या माध्यामातून जेवण दिलं जाणार आहे. हिंदू ग्राहक विमानामध्ये खानपानाची सेवा पुरवणाऱ्या आउटलेटमधून अॅडव्हान्समध्ये शाकाहारी जेवण ऑर्डर करु शकतात, असं कंपनीकडून अधिकृतरीत्या सांगण्यात आलं आहे. यामध्ये जैन जेवण, भारतीय शाकाहारी जेवण, बिफ नसलेलं विशेष जेवण यांसारखे अनेक पर्याय आहेत, हिंदू ग्राहक आपल्या आवडीनुसार विमानाच्या कोणत्याही श्रेणीत जेवण ऑर्डर करु शकतात. पण कंपनीकडून यापुढे ‘हिंदू मील’चा पर्याय हटवला जाईल, असं अमीरात एअरलाइन्सने सांगितलं.


अनेक मोठ्या कंपन्या प्रवासादरम्यान शाकाहारी आणि मांसाहारी खाण्याचा पर्याय देतात, तर एअर इंडिया आणि सिंगापूर एअरलाइन्समध्ये धार्मिक जेवणाचा पर्याय उपलब्ध असतो.