दुबई : फिनजा ज्वेलरीचे संस्थापक आणि अध्यक्ष भारतीय उद्योजग अजय शोभराज यांनी कोरोनाचं संकट सुरु असताना क्वारंटाइनसाठी आपली एक इमारती दान केली आहे. या इमारतीत आता कोरोनाच्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयिताना ठेवण्यात येणार आहे. गल्फ न्यूजच्या माहितीनुसार, दुबई हेल्थ अथॉरिटी (डीएचए) यांना 'टू सपोर्ट अँड गिव बॅक टू द सिटी दॅट केयर्स' शीर्षकसह दुबईत २५ वर्षापासून राहणाऱ्या शोभराज यांनी जुमेराह लेक टावर्समध्ये संपूर्णपणे सुसज्ज अशी इमारत महामारीच्या विरोधात लढण्यासाठी दान केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

77,000 वर्ग फुटाच्या या इमारतीत 400 लोकं राहू शकतात. दुबई मीडिया कार्यालयाच्या एका वक्तव्यानुसार आवश्यक व्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातन आवश्यक त्या सर्व गोष्टी आणि साफ-सफाई केल्यानंतर ही इमारत सुसज्ज करण्यात आली आहे.


शोभराज यांनी म्हटलं की, "माझं असं मत आहे की, अशा प्रकारच्या आव्हानांमध्ये समुदायासाठी एकत्र येणं आणि महामारीला दूर करण्यासाठी आपण ज्या देशामध्ये राहतो त्यांना आपला सहयोग देणं महत्त्वाचं असतं. संकटाच्या क्षणी मी सरकारला ही मदत करुन खूप खूश आहे. ज्यांनी मागील 25 वर्षापासून माझं यश आणि विकासात योगदान देणं सुरु ठेवलं.


संयुक्त अरब अमीरात (यूएई) मध्ये कोरोनाचे 570 रुग्ण आढळले असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे.