दुबईत पायी चालणाऱ्या 44,000 लोकांना ठोठावण्यात आला दंड; कारण समजल्यावर म्हणाल भारतात पण असचं पाहिजे
Dubai News : दुबईत कायदे एकदम कडक आहेत. याच काद्याअंतर्गत दुबईत त पायी चालणाऱ्या 44,000 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे.
Dubai Traffic Rules : दुबई शहर हे अनेकांचे ड्रीम डेस्टीनेशन आहे. ग्लॅमर, लक्झरी लाईफस्टाईल, उंच इमारती आणि अफाट संपत्ती यासाठी जुबई शहर जगभर प्रसिद्ध आहे. दुबईतील कायदे देखील तितकेच कडक आहेत. दुबईतील काही कायदे इतके कडक आहेत की, इतर देशांतील लोक हे कायदे पाहून आश्चर्यचकित होतात. याच कायद्या अंतर्गत दुबईत पायी चालणाऱ्यांना लोकांना हजारो रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याचे कारण सजमल्यावर तुम्ही म्हणाल भारतात ही असाच कायदा पाहिजे.
दुबईत वाहतूक नियमांचे काटेकोर पद्धतीने पालन केले जाते. फक्त वाहन चालकच नाही तर रस्त्याने पायी चालणाऱ्या नागरिकांना देखील वाहतूक नियमांचे काटेकोर पद्धतीने पालन करावे लागते. दुबईत पायी चालणाऱ्यांना लोकांना दंड ठोठावण्यात आपला आहे. वाहतूक नियम मोडल्या प्रकरणी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या पादचाऱ्यांवर 400 UAE दिरहमचा दंड ठोठावण्यात आला आहे.
पादचाऱ्यांसाठी जे वॉकिंग कायदा
दुबईत पायी चालणाऱ्यांसाठी जे वॉकिंग नावाचा कायदा आहे. जे वॉकिंग म्हणजे परवानगी किंवा नियुक्त ठिकाणाशिवाय रस्ता ओलांडणे. जेव्हा एखादी व्यक्ती ट्रॅफिक सिग्नल किंवा झेब्रा क्रॉसिंगकडे दुर्लक्ष करून रस्त्याच्या मधोमध किंवा क्रॉसिंगला परवानगी नसलेल्या ठिकाणाहून रस्ता ओलांडते तेव्हा त्याला जे वॉकिंग असे म्हणतात. जे वॉकिंग कायदा मोडून परवानगीशिवाय रस्ता ओलांडल्यास किंवा ट्रॅफिक सिग्नल तोडल्यास 400 UAE दिरहाम दंड आकारला जातो. गेल्या वर्षी जे-वॉकिंगमुळे आठ जणांचा मृत्यू झाला होता, तर 339 जण जखमी झाले होते. गल्फ न्यूजनुसार, 2023 मध्ये जे-वॉकिंगसाठी 44,000 हून अधिक लोकांना दंड ठोठावण्यात आला होता. भारतात वाहतूक नियमांचे अनेक कायदे आहेत. पण, पादचाऱ्यांसाठी देखील कायदे आहेत. भारतात मात्र, पादचाऱ्यांसदर्भात असलेल्या कायद्याचे काटेपोरपणे पालन होत नसल्याचे दिसून येते. अनेकदा वाहन अपघात हे पादचाऱ्यांच्या चुकांमुळे होतात.