मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ही 'मिस्ट्री गर्ल' चर्चेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ही मिस्ट्री गर्ल संयुक्त अरब अमीरात (यूएई) ची राणी सांगितल जात आहे. हीच पूर्ण नाव शेख लातिफा बिन मुहम्मद बिन राशिद अल - मकतूम सांगितल जात आहे. असं सांगितलं जातं की,ही राणी शेख लातिफा दुबई ही शासक मुहम्मद बिन राशिद अल मकतूम सांगितल जात आहे. जगभरात सध्या एकच चर्चा आहे की, ही राणी कोणत्या गोष्टीसाठी नाराज आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


न्यूज एजन्सी एएफपीने असा दावा केला आहे की, राणी शेख लातिफा यावर्षी लपून मार्च महिन्यात भारतात येऊ इच्छित होती. आणि इथून तिला अमेरिकेला जायच होत मात्र हे शक्य होऊ शकलं नाही.



असा दावा केला जात आहे की, राणी एका छोट्या जहाजात बसून अरब समुद्रापर्यंत पोहोचली होती. मात्र, नशिबाने साथ दिली नाही आणि ती भारतीय नौसेनेच्या नजरेत आली. 



असं सांगितल जात आहे की, भारतीय नौसेने राणीला आपल्या याट जहाजासोबत पकडून यूएई सरकारला परत केलं. यानंतर राणीची कोणतीच माहिती मिळाली नाही.



जगभरातील कोणत्याही मानवाधिकार संघटनांनी राणीबाबत प्रश्न विचारले आहेत मात्र अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.



यूएईतील राजघराण्याने दावा केला आहे की, ती कुटुंबासोबत आहे. मात्र फेब्रुवारीत ते शेवटची ओमानला गेली होती.