Earth Second Moon Everything You Need To Know: अंतराळ आणि अवकाशाबद्दल मानवाच्या मनात असलेलं रहस्य मागील हजारो वर्षांपासून आहे तसेच आहे. नवीन शोध लागत असले तरी या अवाढव्य आणि अमर्याद विश्वाच्या पसाऱ्याबद्दल कायमच उत्सुकता लागून राहिलेली असते. अंतराळामध्ये नेमकं काय होईल हे सांगता येत नाही. आपली पृथ्वी या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये एखाद्या धुळीच्या कणाएवढी आहे असं म्हटलं जातं. पृथ्वीसारखे असंख्य ग्रह अंतराळात आहे. त्यामुळेच या क्षेत्रात नेहमी काही ना काही नवे शोध लागत असतात. आता पुन्हा अंतराळात एक रंजक गोष्ट घडणार आहे.


56 दिवस पृथ्वीला प्रदक्षिणा घालणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या महिन्याच्या शेवटी पृथ्वीवरुन एक नाही तर दोन चंद्र दिसणार आहे. पृथ्वीला मूळ चंद्राबरोबरच एक मिनी मूनही मिळणार आहे. खरं तर हा चंद्र म्हणजे लघूग्रह आहे. हा लघूग्रह पृथ्वीला प्रदक्षिणा घालणार असल्याने त्याला मिनी मून म्हटलं जात आहे. या मिनी मूनचं नाव 2024 पीटी 5 असं ठेवण्यात आलं आहे. हा लघूग्रह 29 सप्टेंबर ते 25 नोव्हेंबर 2024 म्हणजेच पूर्ण 56 दिवस पृथ्वीला प्रदक्षिणा घालणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हा लघूग्रह 10 मीटरचा आहे. या लघूग्रहाचा शोध टेरिस्ट्रिअल-इम्पॅक्ट लास्ट अलर्ट सिस्टीमच्या माध्यमातून लागला आहे.


कसा सापडला हा लघूग्रह?


मिनी मून हा तांत्रिकदृष्ट्या अंतराळातील एखादा खडक किंवा खगोलीय गोष्ट असते असं म्हणता येईल. काही दशकांमध्ये असा एखादा छोटासा घटक पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत येतो. 7 ऑगस्ट 2024 रोजी अॅटलासच्या माध्यमातून शोधण्यात आलेला पीटी5 हा पृथ्वीच्या कक्षेत खेचला गेलेला लघूग्रह आहे. अवघ्या 33 फूट व्यासाचा हा लघूग्रह साध्या डोळांनी दिसणार नाही. त्यासाठी विशेष यंत्रणाचा वापर करावा लागले. सूर्याभोवती फिरण्याआधी हा लघूग्रह पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करेल. 


यापूर्वीही असं घडलेलं?


पीटी5 फार संथ गतीने पृथ्वी भोवती फिरणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हा लघूग्रह अर्जून समुहामधून आलेला आहे. अशाप्रकारे एखादा बाहेरचा घटक मिनी मून म्हणून पृथ्वीच्या कक्षेत येण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी 2006 मध्ये एक लघूग्रह तब्बल वर्षभर पृथ्वीला घिरट्या घालत होता. आता येणारा पीटी5 हा लघूग्रह पुन्हा पृथ्वीजवळ 2055 साली येईल.


साध्या डोळ्यांनी दिसणार नाही


पीटी5 हा मिनी मून स्वरुपातील लघूग्रह साध्या डोळांनी दिसणार नाही. अगदी छोट्या टेलिस्कोपच्या माध्यमातूनही हा लघूग्रह दिसणार नाही. यासाठी प्रयोगशाळेतील दुर्बिणींची मदत घ्यावीलागणार आहे. दगडापासून बनलेला असल्याने अंतराळातील प्रकाश परावर्तित झाला तरच हा चमकेल.