Indonesia Earthquake : अतिप्रचंड भूकंपात 162 मृत्यू; कावऱ्याबावऱ्या नागरिकांचे चेहरे काळजात धस्स करणारे
Indonesia Earthquake : प्रचंड तीव्रतेच्या भूकंपात 162 बळी; लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकानं गमावली हक्काची माणसं
Indonesia Earthquake : इंडोनेशियाची (Indonesia) राजधानी असणाऱ्या जकार्तामध्ये (Jakarta) सोमवारी झालेल्या अतिप्रचंड भूकंपामुळं एकच हाहाकार माजला. मोठाल्या इमारती, घरं पत्त्यांच्या महालासारखी कोसळली आणि या संकटानं 162 बळी घेतले. अवघ्या काही क्षणांच्या भूकंपानं होत्याचं नव्हतं केलं आणि हसरं शहर क्षणार्धात दु:खाच्या गर्द छायेत लोटलं गेलं. रस्त्यांवर आक्रोश- किंकाळ्या आणि कावरेबावरे झालेले नागरिक पाहायला मिळाले. कोणाला दुखापत, कोण रक्तबंबाळ आणि कोण आपल्या माणसांचा शोध घेताना दिसलं. इंडोनेशियामध्ये ओढावलेली ही परिस्थिती पाहूनच काळजात धस्स होत आहे. (Indonesia Earthquake death toll)
प्रशासनाकडून बचावकार्याला सुरुवात भूकंपानंतर माजलेल्या हाहाकाराला पाहता, प्रशासनाकडून लगेचच बचावकार्य हाती घेण्यात आलं. जिथं काही अधिकाऱ्यांनी जखमी आणि मृतांच्या नोंदी घेण्यास सुरुवात केली. सध्याच्या घडीला उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार या भूकंपामध्ये 162 जणांचा मृत्यू झाला असून, 326 हून अधिकजण जखमी आहेत. काळजावर वार करणारी बाब म्हणजे या भूकंपात मृत्यू पावलेल्यांमध्ये बालकांचा आकडा मोठा होता. (Earthquake in indonesian capital jakarta 162 people killed city destroyed)
वाचा : Video: फूटबॉलचा सामना रंगला होता, प्रेक्षक चिअर करत होते, तितक्यात मैदानात ट्रेन आली आणि...
शाळेतून घरी परतणारे लहानगे कायमचेच दुरावले
घटनेशी संबंधित प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या भूकंपाच (Earthquake) मृतांमध्ये लहान बालकांचं प्रमाण जास्त होतं. शाळा संपवून जास्तीची शिकवणी घेण्यासाठी थांबलेल्या अनेकांनाच या भूकंपानं गिळंकृत केलं. Cianjur या भागात मोठ्या प्रमाणात मशीद आणि वसतीगृह- शाळा असल्यामुळं त्यांचा आकडा मोठा असल्याचं सांगण्यात येत आहे.
13 हजारहून अधिक घरांचं नुकसान
साधारण 13 हजारांहून जास्त घरांचं नुकसान या भूकंपात झालं. ज्यानंतर सदर भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. प्राथमिक स्तरावर जखमींना प्रथमोपचार देण्यात आले असून, त्यानंतर त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात आले.
भूकंपाचा केंद्रबिंदू
BNBP नं दिलेल्या माहितीनुसार राजधानी जकार्तामध्ये जवळपास 75 किमी (45 मैल) दूर भूकंप आल्याचं सांगण्यात आलं. यामध्ये 5000 हून अधिक नागरिक विस्थापित झाल्याचं सांगण्यात येत आहे. इंजोनेशियामध्ये विध्वंस करणाऱ्या भूकंपांनी आतापर्यंत कायम हाहाकार माजवसा आहे. 2004 मध्ये उत्तर इंडोनेशियामध्ये सुमात्रा बेटावर 9.1 तीव्रतेचा भूकंप आला होता. या संकटामुळं 14 देश प्रभावित झाले होते.