नवी दिल्ली : पश्चिम जपानच्या ओसाका राज्याला सोमवारी 6.1 तीव्रतेचा भूकंपाचा झटका बसला. या भूकंपामुळे मोठं नुकसान झाल्याचं समजतं आहे. अनेक जण या भूकंपात जखमी झाले आहेत. तर 3 लोकांचा मृत्यू झाल्याचं देखील समोर आलं आहे. जवळपास 50 लोकं जखमी झाले आहेत. भूकंपामुळे संपूर्ण शहराची वीज गायब झाली आहे. ट्रेन सेवा देखील बंद झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भूकंपामुळे अनेक ईमारतीचं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी घराच्या भींती पडल्या. भूकंपामुळे अनेक ठिकाणी आग लागल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार भूकंपाचं केंद्र ओसाकाच्या उत्तर भागात आहे. जपानच्या हवामान खात्याच्या माहितीनुसार भूकंपाचे झटके स्थानिय वेळेनुसार सकाळी 7.58 वाजता लागले. त्सुनामीचा इशारा देखील देण्यात आला आहे. मागील काही दिवसांपैकी हा सर्वात मोठा भूंकप मानला जात आहे.



भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं की, 'मी जपानमधील भारतीय दुतावासाच्या संपर्कात आहे. मदतीसाठी हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आला आहे.'