नवी दिली : भारत आणि चीन वादाबाबत आता चीनने उलट्या बोंबा मारायला सुरूवात केली आहे. शांतता राखण्यासाठी चीनचे प्रयत्न सुरू आहेत, सीमा करारांचे चीन सातत्याने पालन करतोय, असे चीनने म्हटले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या लोकसभेतल्या निवेदनाबाबत चिनी परराष्ट्र खात्याचे प्रवरक्ते वँग वेनबीन यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी हा दावा केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, भारत आणि चिनी सीमेवर चिनी सैन्याच्या आक्रमक हालचालींसह आता नौटंकीलाही सुरूवात झाली आहे. चिनी सैन्याने त्यांच्या फॉर्वर्ड पोस्टवर काल अचानक मोठमोठाले स्पिकर्स आणून पंजाबी गाणी वाजवायला सुरूवात केली. भारताने फिंगर ४ भागातली महत्त्वाची शिखरं काबीज केल्यावर हा प्रकार सुरू झाला आहे. 


भारताकडून या शिखरांवरून चिनी भागावर २४ तास लक्ष ठेवलं जाते आहे. त्यामुळे भारतीय सैनिकांचं लक्ष विचलीत करण्यासाठी चिनी सैनिक मोठमोठ्यांदा गाणी लावत असतील असा अंदाज आहे. आता चीनही ही नौटंकी भारतीय सैनिकांचं लक्ष विचलीत करण्यासाठी की तणाव निवळण्यासाठी हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र चीनने कितीही नौटंकी केली तरी भारतीय लष्कर विचलीत झालेले नाही.