इजिप्तमध्ये दहशतवादी हल्ला; गोळीबारात 305 लोकांचा मृत्यू
इजिप्तच्या उत्तर सिनाई परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे 305 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, असंख्य लोक जखमी झाले आहेत. या भयानक हल्ल्याची जबाबदारी आतापर्यंत कोणत्याच दहशतवादी संघटनेने स्विकारली नाही. मात्र, या हल्ल्यापाठीमागे इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
काहिरा : इजिप्तच्या उत्तर सिनाई परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे 305 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, असंख्य लोक जखमी झाले आहेत. या भयानक हल्ल्याची जबाबदारी आतापर्यंत कोणत्याच दहशतवादी संघटनेने स्विकारली नाही. मात्र, या हल्ल्यापाठीमागे इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मशिदीत गेलेल्या लोकांवर हल्ला
स्थानिक वृत्तवाहिन्यांवर दाखविण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये लोक रक्ताने माखलेल्या अवस्थेत मिशिदीबाहेर कापडांमध्ये गुंडाळलेल्या आवस्थेत दिसत आहेत. नमाज पडण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर मिशिदिमध्ये गेले असता हा हल्ला केला गेल्याची प्राथमिक माहिती आहे.
कसा झाला हल्ला?
मशिदीबाहे काही चारचाकी वाहनांमधून सुमारे 40 बंदूखधारी लोक उतरले आणि त्यांनी अंदाधूंद गोळीबार करण्यास सुरूवात केली. गोळीबार होत असल्याचे समजताच लोकांनी जीव वाचविण्यासाठी वाट फुटेल तिकडे पळण्यास सुरूवात केली. मात्र, बहुसंख्येने असलेल्या हल्लेखोरांनी तूफानी गोळिबार सुरूच ठेवला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवीत हानी जाली. आतापर्यंत हाती आलेल्या माहितनुसा मृतांचा आकडा 305 वर पोहोचला आहे. हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितली दर्दभरी कहाणी
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, लोक मशिदीमध्ये होते आणि हल्लेखोर मशिदीबाहेर. आतील लोकांवर हल्लेखोरांनी गोळीबार सुरू केला. तेव्हा लोक सैरावैरा धावत होते. मात्र, बंदूकधारी हल्लेखोरांनी मशिदील चौफेर वेढले होते. त्यामुळे यात लहान मुले, वृद्ध आणि मोठ्या प्रमाणावर तरूणांचा मृत्यू झाला. दहशतवादी पोलीस, लष्कर आणि सरकारी वाहनांनाही निशाणा बनवत होते. मात्र, त्यांनी मशिदिला का लक्ष्य केले याबाबात माहिती मिळू शकली नाही.
अमेरिकेसह जगभरातील देशांनी केला निषेध
या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह देशभरातील विवीध देशांनी दुख: व्यक्त करत या हल्ल्याचा निषेध केला आहे.