मुंबई : Electric air taxis : भविष्यात रस्त्यांऐवजी हवेतून टॅक्सीने प्रवास करणे आता स्वप्न राहणार नाही. सिंगापूरमध्ये (Singapore) इलेक्ट्रिक एअर टॅक्सी सुरू करण्याची योजना आहे. येत्या दोन वर्षात इलेक्ट्रिक एअर टॅक्सी घेणार टेकऑफ घेणार आहे.(Electric air taxis aims for takeoff in Singapore)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एअर टॅक्सी टेकऑफ घेणार असल्याने हवेतून टॅक्सीने (Taxis in the Sky) प्रवास करणे शक्य होणार आहे. मरीना बे, सेंटोसात 10 ते 20 एअर टॅक्सी चालवण्याचे उद्दिष्ट्य आहे. व्होलोकॉप्टर कंपनीची जय्यत तयारी सुरु झाली आहे. (Volocopter plans to expand in Asia)


व्होलोकॉप्टर कंपनी येत्या दोन वर्षांत सिंगापूरमध्ये इलेक्ट्रिक एअर टॅक्सी सुरू करण्याची योजना आखत आहे.(Volocopter plans to expand in Asia)  यासाठी इंडोनेशिया आणि मलेशिया सारख्या Place of destination फ्लाइट ऑफर करण्यासाठी चर्चा सुरु आहे. कंपनीच्या आशियाई विस्ताराच्या हालचालींचा एक भाग म्हणून याकडे पाहिलं जात आहे. व्होलोकॉप्टरने  देखभाल कार्ये सुरू करण्याची योजना देखील आखली आहे. 



शहर-राज्यासह आशियामध्ये इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग विमानांच्या निर्मितीचा अभ्यास करत आहे. मरीना बे आणि सेंटोसा या लोकप्रिय पर्यटन स्थळांभोवती 10 ते 20 हवाई टॅक्सी चालवण्याचे कपंनीचे उद्दिष्ट आहे. मात्र अद्याप युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीकडून प्रमाणपत्र मिळालेले नाही.