मॅसेच्युसेट्स :  सहसा आपण अनेक ठिकाणी पाहातो, ऐकतो मुलांच्या भावी आयुष्यासाठी पालक आणि शाळा सतत नव्या योजनांचा विचार करतात. पण एक अशी शाळा आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना चक्क इलेक्ट्रिक शॉक दिला जातो. याप्रकरणी अमेरिकेतील एक शाळा तुफान चर्चेत आली आहे. अमेरिकेतील या शाळेत  विद्यार्थ्यांना चक्क इलेक्ट्रिक शॉक दिला जातो. धक्कादायक बाब म्हणजे हे प्रकरण कोर्टातही पोहोचलं आहे. पण कोर्टाने यावरील स्थगिती नाकारली आहे. कोर्टानेही याप्रकरणी हातवर केले आहेत. रॉयटर्सने दिलेल्या एका रिपोर्टनुसार ही शाळा अमेरिकेतील मॅसेच्युसेट्समधील आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोर्टाच्या निर्णयानंतर पालकांचं मत देखील अत्यंत हैरान करणारं आहे. शाळेत मुलांना दिला जाणार इलेक्ट्रिक शॉक योग्य असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिली आहे. काही मुलांच्या पालकांचे म्हणणे आहे की, इलेक्ट्रिक शॉक हे त्यांच्या मुलांचं जीवन वाचवण्यासाठी हा उपाय 'लाइफ सेव्हेंग ट्रीटमेंट' ठरला आहे. शिवाय हा उपाय त्यांच्यावर प्रभावी असल्याचे देखील सिद्ध झाले आहे.


मॅसेच्युसेट्समधील या शाळेचं नाव रोटनबर्ग एज्युकेशन आहे. या प्रकरणी कोर्टाने सांगितलं की, फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेश शाळेला Graduated Electronic Decelerator (GED)चा वापर करण्यासाठी कोणीचं थांबवू शकतं नाही. कारण इलेक्ट्रिक शॉक हाच एक अंतिम  उपाय आहे. रिपोर्टनुसार, या शाळेत फक्त अशा विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे जे मानसिकदृष्ट्या प्रभावी आहेत. 


असे विद्यार्थी आत्महत्या करण्याचा देखील विचार करतात त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी अशा शाळांमध्ये या पद्धती अवलंबल्या जातात. यापूर्वी देखील असा प्रकार समोर आला होता. दरम्यान एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.