माणसांपेक्षाही संवेदनशील हत्ती, मृत्यूनंतरही एकटं सोडत नाही; रिसर्चमधून खुलासा
या हत्तींकडून माणसानं शिकायला हवं... जिवंतपणीच नाही तर मृत्यूनंतरही कशी साथ निभावायची
नवी दिल्ली : माणांसाना जे कळत नाही ते या मुक्या प्राणांना समजतं. मुक्या प्राणांचा एकमेकांवर जास्त जीव असतो. संकटात अडकल्यावर धावून येतात किंवा एखादा प्राणी गेला त्यावर दु:खंही तेवढंच जास्त होत असतं. हत्ती हा सर्वात बुद्धिवान प्राणी आहे. जंगलात हत्तीला सगळे प्राणी मान देतात. याच हत्तीबाबत आता एक नवीन माहिती समोर आली आहे.
हत्तीही माणसाप्रमाणे आपल्यातील कोणीतरी गेल्याचं दु:ख व्यक्त करतो. याचा खुलासा 2013 मध्ये संजीता पोखारेल यांनी केला. एका अभयारण्यात मादा हत्तीणीचा मृत्यू झाला. त्यावेळी तिच्याभोवती बाकीचे हत्ती गोल फिरताना दिसले.
स्मिथसोनियन कंजरवेशन बायोलॉजी इंस्टीट्यूट जीवशास्त्रज्ञ डॉ. संजीता पोखरेल यांनी सांगितले की, हे दृश्य पाहून आम्ही तिथे थांबू शकलो नाही पण आम्ही या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ काढला.
संजीता यांच्यासोबत जपानमधील क्योटो विद्यापीठातील वन्यजीव शास्त्रज्ञ नचिकेता शर्मा होत्या. दोघांनाही याबाबत अधिक अभ्यास करायचा होता. कारण असे दृश्यं पाहायला फार दुर्मीळ मिळतं.
हत्ती हा सामाजिक बांधीलकी जपणारा प्राणी आहे. तो कळपात राहातो. प्रेम आणि सुरक्षा या दोन्ही गोष्टी या कळपात पाहायला मिळतात. तज्ज्ञांच्या अहवालानुसार हत्ती मृत हत्तीच्या भोवती गोल फिरतात. त्याला स्पर्श करतात त्याला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्याला पुन्हा जागं करण्यासाठी धडपड करतात.
जर हत्तीचं पिल्लू गेलं असेल तर त्याची आई म्हणजे हत्तीण त्याला सोंडेनं मारून उठवण्यासाठी धडपड करते. ती त्याला भोवती गोल फिरते आणि त्याला उठवण्यासाठी प्रयत्न करते.
एका अभ्यासातून आणि युट्यूबर असलेल्या डेटामधून आणखी एक गोष्ट समोर आली. काही हत्ती आपला साथीदार गेल्यानंतर त्याला स्पर्श करतात किंवा सोंडेचा वापर करतात. मृत हत्तीचा चेहरा आणि कान दोन्हीला सोंड लावून ते पाहतात की आपला साथीदार आपल्याला सोडून गेला.
डॉ पोखारेल यांच्या म्हणण्यानुसार हत्ती स्पर्शाने संवेदना निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्या मृत साथीदाराला वेगवेगळ्या पद्धतीने उठवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना कुठेतरी मनात असं वाटत असतं की हा हत्ती पुन्हा एकदा जिवंत होईल.
हत्तीची दुसरी प्रतिक्रिया असते ती म्हणजे तो जोरात चित्कारतो. मृत हत्तीभोवती गोल करून इतर हत्ती ओरडतात. त्यांच्या मध्ये जर कोणी इतर प्राणी यावेळी आला किंवा एखादा माणूस आला तर त्याचं काही खरं नाही. तो मृतदेह दुसऱ्या कोणाच्या हाती लागू नये आणि त्याचा गैरफायदा कोणी घेऊ नये यासाठी हा सगळा खटाटोप हत्तींचा सुरू असतो.