Twitter च्या मालकाने ऑर्डर केलं नवं लक्झरी जेट, किंमत ऐकून उद्योगपतींना ही धक्का बसेल
Elon Musk : एलोन मस्क यांनी एक नवीन खाजगी जेट खरेदी केले आहे. ज्याची किंमत पाहून तुम्हाला ही विश्वास बसणार नाही.
Elon Musk new Jet : ट्विटर कंपनीत सध्या मोठे बदल होत आहेत. ट्विटरचे सर्व डायरेक्टर हटवण्यात आले आहेत. त्यामुळे Twitter CEO Elon Musk पुन्हा चर्चेत आहेत. मायक्रोब्लॉगिंग साइट Twitter $ 44 बिलियनमध्ये खरेदी केल्यानंतर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांनी आणखी एक मोठी खरेदी केली आहे. त्यांनी एक महागडे जेट ऑर्डर केले आहे. ज्याची किंमत 78 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 6 अब्ज रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे.
गल्फस्ट्रीम G700 जेटची ऑर्डर
ऑस्टोनियाच्या हवाल्याने बिझनेस इनसाइडरच्या अहवालात हे वृत्त दिले आहे. टेस्ला, स्पेसएक्स आणि ट्विटर या कंपनींचे मालक इलॉन मस्क हे खाजगी जेटचे मोठे चाहते आहेत आणि आता त्यांनी त्यांच्या विमान संग्रहात एक नवीन विमान समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी स्वत:साठी गल्फस्ट्रीम G700 जेट ऑर्डर केले आहे.
G700 हे विमान लक्झरी फीचरसाठी ओळखले जाते. याचा प्रवास आणि मेंटनेन्स खर्च देखील खूप जास्त आहे. लिबर्टी जेटच्या अहवालानुसार, सुमारे 400 तास उड्डाण करण्यासाठी $3.5 दशलक्ष खर्च येतो. या खाजगी जेटमध्ये 19 लोकांच्या बसण्याची क्षमता आहे.
G700 2019 मध्ये लाँच
G700 एक लक्झरी जेट आहे. जे ऑक्टोबर 2019 मध्ये लॉन्च केले गेले होते. एलोन मस्क आपला बहुतेक प्रवास नियमित विमानांमधून करतात. 2018 मध्ये, जगातील या सर्वात मोठ्या अब्जाधीशाने त्यांच्या G650ER जेटद्वारे सुमारे 150,000 मैलांचा प्रवास केला. मात्र, या नवीन जेटच्या खरेदीबाबत इलॉन मस्क किंवा त्यांची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
G700 मध्ये या खास सुविधा
या विमानाची लांबी 109 फूट 10 इंच आणि उंची 25 फूट 5 इंच आहे. या जेटने जॉर्जिया ते जिनिव्हा हे अंतर 7 तास 37 मिनिटांत पूर्ण करता येते. वाय-फाय, 20 खिडक्या आणि दोन मोठी स्वच्छतागृहे या विमानात आहेत. याशिवाय डायनिंग एरिया देखील देण्यात आला आहे.