मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती टेस्ला आणि स्पेस एक्सचे सीईओ एलॉन मस्कचे (Elon Musk) वडील एरोल मस्क (Errol Musk) यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी सावत्र मुलीसोबत शारीरीक संबंध ठेवल्याची धक्कादायक माहिती दिली होती. त्यानंतर आता याच नात्यावर त्यांनी आणखीण एक मोठा खुलासा केला आहे. हा खुलासा एकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एरोल मस्कचे (Errol Musk) सावत्र मुलगी जना बेझुइडेनहाउटसोबत (Jana Bezuidenhout) अफेअर होते. 76 वर्षीय एरोल मस्क आणि 35 वर्षीय जना बेझुइडेनहाउट सोबतच्या अफेअरच्या या खुलास्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. यानंतर आता एरोल मस्क यांनी जनापासून त्यांना दोन मुले असल्याचा मोठा खुलासा केला आहे.  


एरोल मस्कला सात मुले 
एरोल मस्क आणि जना बेझुइडेनहाउटला पाच वर्षांचा मुलगा आहे. ज्याचे नाव इलियट रश. याचा जन्म 2017 मध्ये झाला होता. यानंतर, 2019 मध्ये बेझुइडनहाऊटने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. जी एक मुलगी आहे. म्हणजेच एरोल मस्क यांना टेस्लाचे सीईओ एलोन मस्कसह एकूण सात मुले आहेत.


एलॉन मस्कची आई माये हॅल्डेमन मस्कपासून एरोल मस्क विभक्त झाले. त्यांना माये पासून अॅलन, किंबल आणि टोस्का अशी तीन मुले आहेत. माये मस्कपासून विभक्त झाल्यानंतर एरोल यांनी विधवा असलेल्या हेड बेझुइडेनहाउटशी लग्न केले. हेडला आधीच दोन मुले होती, ज्यात जना बेझुइडनहाउटचा समावेश होता. 


दरम्यान १८ वर्षे एकत्र राहिल्यानंतर एरोलने हेडला घटस्फोटही दिला. त्यानंतर एरोलचे सावत्र मुलगी जना बेझुइडेनहाउटसोबत अफेअर सुरु झाले. या अफेअरापासून त्य़ांना दोन मुले आहेत. याबाबत नुकतीच एरोल मस्क यांनी खुलासा केला आहे.