Elon Musk Fired Employee : मोठ्या संख्येवर कर्मचाऱ्यांना ट्विटरमधून बाहेरचा रस्ता दाखवणाऱ्या एलन मस्कनं पुन्हा (Elon Musk) एकदा त्याचे तालरंग दाखवत अनेकांनाच हैराण केलं आहे. पहिल्या दिवशीच ट्विटरच्या (Twitter office) ऑफिसमध्ये सिंक घेऊन  जाणाऱ्या मस्कनं हळुहळू कर्मचारी कपात सुरु केली. पाहता पाहता याच्या झळा अनेकांनाच लागल्या. आता तर म्हणे याच मस्कनं ज्या ट्विटरसाठी त्याच्या कर्मचाऱ्यानं इतकी मेहनत घेतली, त्यालाच कामावरून काढून टाकलं. तेसुद्धा जाहीर. तुम्ही अनिल कपूरचा (Anil Kapoor) ‘नायक’ चित्रपट पाहिलाय का? तिथं तो जसा अकार्यक्षम कर्मचाऱ्यांना जाहीररित्या कामावरून काढून टाकतो, तसंच काहीसं मस्कनं केलं. पण, इथे चुकी कोणाची यावरून मात्र वादंग माजलं. (elon musk fires twitter employee publicly netizens left shocked )


कुठे बिनसलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हल्लीच मस्क यांनी ट्विटरचं अँड्रॉईड ऍप (Twitter Android app) फारसं सुरळीत सुरु नसल्याचं म्हणत सोशल मीडिया युजर्सकडे माफी मागितली होती. त्यांच्या या ट्विटवर या App च्या डेवलपरनं कमेंट केली, ज्यानं या संस्थेसाठी 6 वर्षे काम केलं होतं. त्या दोघांमध्येही शाब्दिक बाचाबाची इतकी वाढली, की पुढे मस्कनं  कर्मचाऱ्याला थेट कामावरूनच काढलं.



Eric Frohnhoefer या कर्मचाऱ्यानं त्याला सिस्टीम लॉगईन्समधून (system logins) ब्लॉक करण्यात आल्याचे फोटो पोस्ट करत नोकरीवरून काढणं ही थट्टा नसून सत्यात तसा प्रकार घडल्यावर शिक्कामोर्तबही केलं होतं. ज्यानंतर त्यानं ट्विटर बाtयोमध्ये बदल करत Formerly Twitter असं नमुद केलं.


कोण चुकलं, मस्क? की त्याला प्रत्युत्तर देणारा कर्मचारी?


मस्कला त्याची चूक दाखवून देणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याचं हे वागणं भोवलं. पण, तिथे काहींच्या मते आपल्या नोकरीच्या ठिकाणचे वाभाडे इथे का काढा, अशाही प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्या. काहींनी मस्कची बाजू घेत कर्मचाऱ्याचं त्याच्याशी असं वागणं योग्य नसल्याचं म्हटलं. थोडक्यात ट्विटरचा हा वाद इतका टोकाला गेला की, बॉसची वृतती आणि आपण केलेल्या कामाची उत्तरं देणारा कर्मचाऱी यांच्यातील खडाजंगी जाहीरपणे सर्वांना पाहता आली.


वाचा : G-20 Summit: पंतप्रधान मोदी आणि ऋषी सुनक यांची पहिली भेट, दोघांमध्ये काय झाली चर्चा?


कर्मचाऱ्यांना घाबरवणं ही Musk ची Working Style


दरम्यान, काही दिवसांपूर्वीच एलन मस्कनं त्याच्या कर्मचाऱ्यांसाठी काही इशारे दिले. यामध्ये त्यांना आठवड्याचे 80 तास काम करण्याची तयारी दाखवण्याचाही इशारा होता. शिवाय मोफत खाणं-पिणं आणि घरून काम करण्याची सुविधाही बंद असल्याचा इशारा दिला होता. मस्कच्या बोलण्यातून आलेला हा सूर पाहता कर्मचाऱ्यांना धडकीच भरली. काहींनी तर थेट असा बॉस नको रे बाबा! म्हणत कानाला खडा लावला. थोडक्यात ही घाबरवत काम करून घेण्याची मस्कची शैली सध्या वादाचा विषय ठरताना दिसत आहे.वा