COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : ट्विटर विकत घेतल्यानंतर Elon musk सध्या खूप चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ट्विटर ही जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया कंपनी विकत घेतली.  ट्विटर विकत घेतल्यानंतर Elon Musk यांचे आणखी एक नवीन ट्विट खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी सॉफ्ट ड्रिंक कंपनी कोका कोला खरेदी करण्याबद्दल म्हटलं आहे.


Elon Musk कोका-कोला खरेदी करणार?



Elon Musk यांनी 28 एप्रिल रोजी सकाळी ट्विटरवर एक ट्विट केले की 'आता मी कोका-कोला विकत घेईन जेणेकरून मला कोकेन घालता येईल.' अवघ्या अर्ध्या तासात या ट्विटला 7 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले असून हजारो कमेंट्स आल्या आहेत.


कोका कोला हे नाव कसे पडले?


कोका कोला हे एक अतिशय लोकप्रिय शीतपेय उत्पादन आहे. पूर्वी हे कोकाच्‍या पानांपासून बनवलेले पेय होते. जे सौम्य नशेसाठी वापरते जात असे. म्हणूनच त्याला कोका-कोला हे नाव पडले. परंतू 1906 नंतर कंपनीने पानांपासून कोकेन वेगळं करण्यास सुरुवात केली आणि नंतर ते पेय म्हणून वापरले.


Elon Musk  कोण आहे?


Elon Musk  हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. ते टेस्ला कंपनीचे सीईओ आहेत. आता ते ट्विटरचेही बॉस होणार आहेत. Elon   हे स्पेस एक्सचे संस्थापक आहेत. टाईम मासिकाने त्याची पर्सन ऑफ द इयर म्हणून निवड केली आहे.