मुंबई : जगभरातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती एलन मस्क (Elon Musk) नुसते श्रीमंतीसाठीच नव्हे तर, तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी ओळखले जातात. टेस्ला ऑटो पायलट कार, मंगळावर नागरी वस्ती हा याचा प्रत्यक्ष पुरावा आहे. या सर्वांत आता एलन मस्क Humanoid रोबोट Optimus लाँच केला आहे. या रोबोटची वैशिष्ट्य एकूण जगाला धक्का बसला आहे. नेमका या रोबोटची वैशिष्ट्य काय आहेत, ती जाणून घेऊयात.  
 
व्हिडिओत काय?
एलन मस्कने (Elon Musk) एका AI कार्यक्रमात आपला Humanoid रोबोट Optimus लाँच केला आहे. या रोबोटचा प्रोटोटाइप स्टेजवर उतरवण्यात आला असून त्यासोबत त्याचा एक व्हिडिओही दाखवण्यात आला आहे, ज्यामध्ये हा रोबोट बॉक्स उचलताना, झाडांना पाणी घालताना आणि मानवी काम करताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एलन मस्क काय म्हणाले? 
या रोबोटचा सर्वात महत्वाचा पल्ला आम्ही गाठणार आहोत. हा रोबोट अनपेक्षित परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहे की नाही याची आम्ही चाचपणी करणार आहोत. यासोबत सुरुवातीला ऑप्टिमसला कंटाळवाणा आणि धोकादायक कामांमध्ये टाकून त्याची चाचणी केली जाईल, असे मस्क म्हणाले आहेत. 


रोबोट टेस्लाच्या (Tesla) कारखान्यांमध्ये वस्तू हलवण्याचे आणि कार उत्पादनादरम्यान बोल्ट घट्ट करण्याचे काम करेल, असे त्यांनी म्हटले. हा रोबोट त्यांच्या कार व्यवसायापेक्षा व्यवसायात अधिक यश देईल, त्यामुळे लवकरात लवकर हा ह्युमनॉइड रोबोट (Humanoid Robot Optimus) बनवण्याचा आमचा उद्देश असल्याचे एलन मस्क म्हणाले आहेत. 


'हा' रोबोट कोणती काम करू शकतो? 
ह्युमनॉइड रोबोट (Humanoid Robot Optimus) फर्म ऍजिलिटी रोबोटिक्सचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी जोनाथन हर्स्ट यांनी रॉयटर्सला सांगितले की, रोबोट भविष्यात मानव जे काही करतो त्यापेक्षा बरेच काही करू शकेल, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच आगामी काळात हा रोबोट केवळ घरातील कामेच करणार नाही, तर माणसाचा पार्टनर म्हणूनही वापर करता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.मस्क यांनी देखील या मुद्याला दुजोरा दिला आहे. भविष्यात रोबोट्सचा वापर घरांमध्ये, जेवण बनवण्यासाठी, लॉन कापण्यासाठी आणि वृद्धांची काळजी घेण्यासाठी आणि माणसासाठी पार्टनर म्हणून देखील होणार आहे. 


दरम्यान मस्कने (Elon musk) ऑगस्ट 2021 मध्ये झालेल्या AI इव्हेंटमध्ये टेस्लाच्या या रोबोटची घोषणा केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2023 पासून त्याचे उत्पादन सुरू होऊ शकते. या रोबोटची अनेकांना उत्सुकता लागली आहे.