सेक्स रॅकेट उघड, या अभिनेत्रींना ३ तासांचे पावणे दोन लाख
सेक्स रॅकेट चालवणाऱ्यांच्या हातात बेड्या पडल्यात. धक्कादायक म्हणजे या सेक्स रॅकेटमध्ये काही अभिनेत्रींचाही समावेश होता.
नवी दिल्ली : परदेशात सेक्स रॅकेट चालवणाऱ्यांच्या हातात बेड्या पडल्यात. धक्कादायक म्हणजे या सेक्स रॅकेटमध्ये काही अभिनेत्रींचाही समावेश होता. अभिनेत्रींचे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या भारतीय वंशाच्या दाम्पत्याला गेल्या आठवड्यामध्ये शिकागोमध्ये अटक करण्यात आली. दरम्यान, या सेक्स रॅकेटमध्ये सहभागी अभिनेत्री तीन तासांचे पावणे दोन लाख रुपये घेत असल्याची माहिती पुढे आली.
या अभिनेत्रींचा यात समावेश
अमेरिकेमध्ये टॉलिवूड इंडस्ट्रीमधील आंध्र अभिनेत्रींचे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या भारतीय वंशाच्या जोडप्याला शिकागोमध्ये अटक करण्यात आली. या प्रकरणी शिकागो न्यायालयामध्ये एकूण ४२ पानांची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये भारतीय वंशाच्या जोडप्यासह तेलुगूमधील पाच अभिनेत्रींचाही समावेश आहे. तपासामध्ये अनेक धक्कादायक माहिती उजेडात येत आहे.
कसे चालायचे सेक्स रॅकेट
या सेक्स रॅकेट प्रकरणातील मुख्य आरोपी किशन मोदुगुमुडी तथा श्रीराज चोन्नूपत्ती आणि त्यांची पत्नी चंद्रा यांनी अमेरिकेतील तेलुगू असोसिएशन ऑफ साऊथ कॅलिफोर्निया आणि नॉर्थ अमेरिका तेलुगू सोसायटी यांसारख्या नामांकित संघटनेच्या नावाने एक बनावट लेटरहेट तयार केले होते. मे २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यान व्हिसा मिळवण्यासाठी या लेटरहेडचा गैरवापर करण्यात आल्याचे ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने आपल्या वृत्तात म्हटलेय. सेक्स रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या या तेलुगू अभिनेत्रींना तीन तासांचे २५०० डॉलर्स म्हणजे पावणे दोन लाखांपेक्षा जास्त रुपये मिळायचे.
बॅगेमध्ये ७० कंडोम सापडले
पोलिसांनी किशन आणि चंद्राच्या घरी धाड टाकली तेव्हा त्यांना तिथे वेगवेगळया बॅगेमध्ये ७० कंडोम सापडले. त्यांनी घरात एक नोंदवही ठेवली होती. त्या वहीमध्ये अभिनेत्रींची सर्व माहिती तसेच बनवाट कागदपत्रंही पोलिसांना आढळली आहेत.