एमिरेटस् एअरलाईन्सच्या विमानांमध्ये हिंदू जेवणाचा मेन्यू होणार बंद
आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या विमानांमध्ये अनेक प्रवासी आपल्या धार्मिक श्रद्धेनुसार जेवणाचा पर्याय निवडतात.
नवी दिल्ली: दुबईच्या एमिरेटस् एअरलाईन्सच्या प्रशासनाने त्यांच्या विमानांमधील हिंदू जेवणाचा मेन्यू बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या विमानांमध्ये अनेक प्रवासी आपल्या धार्मिक श्रद्धेनुसार जेवणाचा पर्याय निवडतात. अनेक प्रवासी विमानाचे तिकीट बुक करतानाच जेवणाचा पर्याय निवडतात. मात्र, एमिरेटस एअरलाईन्सने यापुढे त्यांच्या विमानातील हिंदू मिल हा जेवणाचा पर्याय रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. प्रवाशांना पुरवण्यात येणारे खाद्यपदार्थ आणि सुविधांबाबतच्या अंतर्गत सर्वेक्षणानंतर आम्ही हिंदू मिल हा पर्याय रद्द करण्याचा निर्णय घेतला. पण हिंदू प्रवासी इतर प्रांतिक जेवणाची आगाऊ ऑर्डर देऊ शकतात. यामध्ये व्हेज जैन, इंडियन व्हेज, कोशेर, नॉन बीफ नॉनव्हेज असे पर्याय उपलब्ध असतील, असे एमिरेटस् एअरलाईन्सच्या प्रवक्त्यांकडून स्पष्ट करण्यात आले.