Employee Boss news: नोकरी करत असताना थोडा ताण-तणाव सहन करावाच लागतो. कामाचा प्रेशर तर कर्मचाऱ्यांवर सतत असतच पण जर तुमचे सहकारी आणि बॉस सपोर्टिव्ह व असंवेदनशील असतील कर कर्मचाऱ्यांचा काम करण्याचा उत्साहच निघून जातो. अलीकडे सोशल मीडिया हे असं माध्यम आहे जिथे आपल्या मनातील सगळी दुःखे शेअर करता येतात. यात ऑफिसमध्ये येणारी आव्हानेदेखील आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यात बॉसने कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये फोन चार्जिंग करण्यास मनाई केली, त्याचे कारण ऐकून तुमचाही संताप होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका युजर्सने रेडिटवर पोस्ट करत त्याला आलेल्या अनुभव शेअर केला आहे. त्याच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्याचे समर्थन केले आहे. पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे की, ऑफिसमध्ये फोन चार्ज करतो त्यासाठी माझ्या बॉसने माझ्यावर वीजचोरीचा आरोप केला आहे. मी खासगी कामांसाठी ऑफिसमधील वीज चोरी करतो, असं त्याचे म्हणणे आहे. यावर तुमचे काय म्हणणे आहे. मी पूर्ण दिवस फोनचा वापर करत नाही. कधी-कधी रात्री झोपताना मी फोन चार्ज करण्यास विसरतो. कारण माझा डेस्क जॉब आहे. म्हणून मी ऑफिसमध्ये फोन चार्जिंगला लावतो, असं या कर्मचाऱ्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहलं आहे.


कर्मचाऱ्याची पोस्ट पाहून  नेटकरीही हैराण झाले आहेत. सोशल मीडियावर बॉसवर सडकून टीका केली आहे. एका युजरने म्हटलं आहे की , तुमचा बॉस मुर्ख आहे. कंपनीच्या वीज चोरीचा आरोप करणे म्हणजे श्वास घेणे म्हणजे कंपनीची हवा चोरी करणे असा आहे. किंवा पाणी पिणे ही कंपनीचे पाणी चोरी करणे असा अर्थ होतो. 


ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कर्मचाऱ्याने आणखी एक पोस्ट केली आहे. त्यात त्याने म्हटलं आहे की त्याला अलीकडेच कळलं की माझ्या बॉसला या महिन्याच्या अखेरीस नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं आहे. त्याने पुढं लिहलं आहे की, आज टीममध्ये एक जाहीर करताना आम्हाला कळलं की ज्या बॉसने माझ्यावर फोन चार्जिंग करण्यावरुन कमेंट केली त्याला या महिन्याच्या अखेरीस कामावरुन काढून टाकण्यात येणार आहे. म्हणूनच तो रागाच्या भरात सगळ्यांवर डाफरत आहे.


या पोस्टवर युजर्सने मजेशीर कमेंट केल्या आहेत. तुम्ही तुमच्या बॉसचा फोन उचलू नका कारण जर तुम्ही फोन उचलत असाल तर तुम्ही कंपनीचा टॉकटाइम आणि बॅटरीची चोरी करत आहात. तर, अन्य एकाने म्हटलं आहे की, तुम्ही तुमच्या बॉसला सांगा की शौचालयात जात असताना फ्लशचा वापर करुन नका कारण यामुळं पाणी चोरी होते.