दर महिन्याला मिळणार 19 हजारांचा बोनस, कंपनीच्या मालकाने कर्मचाऱ्यांना दिलं मोठं सरप्राईज
या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पगाराशिवाय ही रक्कम दिली जाईल. स्वतः कंपनीच्या मालकाने याबाबत घोषणा केली आहे. मालकाच्या औदार्यानंतर आता कंपनीतील कर्मचारीही प्रचंड आनंदी आहेत. वाढत्या महागाईत कंपनीच्या मालकाने उचललेल्या या पावलांचं आता सर्व स्तरातून कौतुक होतंय.
Every month 200 pound bonus: महागाई वाढतेय. अशात तुमच्या कंपनीने तुम्हाला दर महिन्याला 19 हजारांचा बोनस जाहीर केला तर? तुमचा आनंद गगनात मावणार नाही. एका कंपनीच्या बॉसने कर्मचाऱ्यांना असाच आनंदाचा धक्का दिला आहे. ही आनंदाची बातमी समजताच कर्मचाऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाहीये. पुढील आदेश येईपर्यंत या कंपनीतील कर्मचाऱ्यांना दर महिन्याला 19 हजारांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या पगाराव्यतिरिक्त त्यांना हे पैसे दिले जाणार आहेत.
'द सन'च्या माहितीनुसार ब्रिटनमधील 4Com या कंपनीतील सर्व 431 कर्मचाऱ्यांना पुढील आदेशांपर्यंत जवळजवळ 19 हजारांचा बोनस मिळणार आहे. ब्रिटनमध्ये सध्या विजेचे दर प्रचंड वाढले आहेत, अशात कर्मचाऱ्यांना मदत म्हणून हा बोनस जाहीर करण्यात आला आहे. स्वतः कंपनीच्या मालकाने त्यांच्या कर्मचाऱ्यांसोबतच्या मीटिंगमध्ये याबाबत घोषणा केली आहे. मालकाच्या या औदार्यानंतर कंपनीतील कर्मचारी प्रचंड आनंदी आहेत.
टेलिकॉम सेक्टरमधील उपकरणं बनवणारी कंपनी
1999 मध्ये 4Com या कंपनीची सुरुवात झाली. ही कंपनी टेलिकॉम सेक्टरमधील उपकरणे बनवणारी कंपनी आहे. सध्या 5G चा जगभरात बोलबाला आहे. अशात सध्या ही कंपनी चांगली नफ्यात आहे. कंपनीचे मालक गॅरी स्कट यांनी पुढील आदेशापर्यंत कर्मचाऱ्यांना 19 हजारांचा बोनस जाहीर केलाय.
बोनसबाबत घोषणा करताना मालक गॅरी यांनी याची तात्काळ अंमलबजावणी करण्यास सांगितलं आहे. कंपनीत अनेक वर्ष मेहनतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे लक्ष देणं ही आमची प्राथमिकता असल्याचं कंपनीनेच मालक म्हणतात. ही टीम आमची संप्पती असल्याचंही ते बोलतात.
employees of 4com company to get about 19 thousand rupees as bonous untill further notice