Google : आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत अपेक्षेनुसार कमाई न झाल्याने गूगलने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मनोरंजन आणि प्रवासाच्या बजेटमध्ये कपात केली आहे. आधी नोकरींमध्ये कपात केली आणि त्यानंतर मनोरंजन बजेटमध्ये कपात केल्याने कंपनीचे कर्मचारी नाराज झाले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना कंपनीचे सीईओ सुंदर पिचईकडून याबद्दलच्या उत्तराची मागणी असल्याचं समजतयं. 'पैसा आणि पर्क म्हणजे सर्वकाही नसतं. कंपनीने केलेली कपात ही मंदीच्या काळात कर्मचाऱ्यांचं हित लक्षात घेऊन केली आहे. म्हणून, याबद्दल नाराज न होता आपल्या कामाचा आनंद घ्या.', असं गूगलचे सीईओ सुंदर पिचई (Sundar Pichai)यांनी सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

CNBC च्या एका रिपोर्टनुसार, मागच्या आठवड्यातील कॉस्ट कटिंगसंदर्भात पिचई यांना कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना सामोरं जावं लागलं होतं. कर्मचाऱ्यांच्या मते, अशा प्रकारच्या बजेट कपातीमुळे कंपनीचे कर्मचारी कमकूवत आणि अस्वस्थ बनतात.


गूगलकडे (Google) असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्येच्या तुलनेत उत्पादकता दिसत नाहीये. असं वक्तव्य करुन कंपनीचे सीईओ पिचई यांनी हायरिंग प्रक्रियेचा वेग कमी करण्याचे संकेत दिले आहेत. 


आयटी क्षेत्रातील कंपन्या, सध्या प्रतिकूल आर्थिक परिस्थिती लक्षात घेता अधिक मेहनत करण्याची तयारी करत आहेत. जगभरात व्याज दरात वाढ होतीये आणि स्टार्टअप कल्चर देखील आत्ता आधी सारखं सोप्प राहीलं नाही. अशातच, गूगल (Google) आणि फेसबुक (Facebook) सारख्या कंपन्या, पर्क आणि इतर सुविधांमध्ये कपात करत आहेत.