नवी दिल्ली : चीनच्या फुजियान प्रांतातील एका शहरातील सिनेमागृह, जिम आणि महामार्ग देखील बंद करण्यात आले आहेत. येथील रहिवाशांना शहर न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक पातळीवर कोरोना संसर्ग पुन्हा वाढल्यानंतर चीनच्या या शहरात हा निर्णय घेण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, सोमवारी स्थानिक प्रसारमाध्यमांनी असे वृत्त दिले की फुजियानच्या पुतियन शहरात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. कोरोना संक्रमणाची आणखी नवीन प्रकरणे वाढत आहेत. पुतियान शहराची लोकसंख्या 3.2 दशलक्ष आहे. येथे कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता, चीनच्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने तज्ज्ञांचे पथक या शहरात पाठवले आहे. शाळांमध्ये देखील बंद करण्यात आल्या आहेत.


चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या मते, 10 ते 12 सप्टेंबर दरम्यान फुजियानमध्ये कोरोनाचे 43 नवीन प्रकरणांची नोंद करण्यात आली. त्यापैकी 35 पुतियन येथे आढळली आहेत. याशिवाय, 10 सप्टेंबरपासून पुतियनमध्ये 32 लक्षणे नसलेली प्रकरणे देखील नोंदवली गेली आहेत.


12 सप्टेंबरपर्यंत चीनमध्ये एकूण 95,248 कोरोनाची प्रकरणे नोंदवली गेली तर 4,636 लोकांचा मृत्यू झालाय. कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटमुळे संसर्ग वाढत असल्याचं स्थानिक प्रशासनाने म्हटलं आहे.