Davos 2023 : दावोसमध्ये वेश्याव्यवसाय जोरात; गडगंज संपत्ती असणारे अशी घेतायत `खास` सेवा
World Economic Forum Excort Service in Davos : सध्या जगभर चर्चा आहे ती म्हणजे दावोस येथे भरलेल्या `वर्ल्ड एकोनॉमिक फोरम`ची. परंतु आर्थिक भेटीगाठींसोबतच आणि व्यवहारांसोबत येथे अतिश्रीमंतांकडून खास सेवाही आकाराली जाते आहे, पाहूया काय आहे रिपोर्ट...
World Economic Forum Excort Service in Davos: सध्या जगभर चर्चा आहे ती म्हणजे दावोस येथे भरलेल्या जागतिक विश्व परिषदची म्हणजे 'वर्ल्ड इकोनॉमिक फोरम'ची. या परिषदेला जगातील नामवंत राजकारणी, व्यावसायिक आणि इतर नामवंत लोकांनी हजेरी लावली आहे. परंतु समोर आलेल्या माहितीनुसार, दावोस (WEF, 2023) येथे आलेल्या या खास पाहूण्यांची 'खास' सोय करून घेण्यात येते आहे. वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये आलेल्या पाहूण्यांनी एस्कॉर्ट सर्व्हिसेसचा लाभ घेतल्याचे समजते आहे. या महिलांनी त्यांच्याकडून खसखशीत चार्जेसही घेतले आहेत. 16 ते 20 जानेवारी दरम्यान वर्ल्ड इकोनॉमिक फोरम सुरू होते. या दरम्यान देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मागणीत (Demand for Escorts) प्रचंड वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे आणि यासंदर्भातील वृत्त हे आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी समोर आणले आहे. (escort service in davos booming during world economic forum summit)
न्यूयॉर्क पोस्ट, ग्रीक रिपोर्टेर आणि डेली मेल यांनी या संदर्भात वृत्त सादर केले आहे. यांनी दिलेल्या वृत्तातून समजते की, वर्ल्ड एकोनॉमिक फोरम सुरू असताना देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मागणीत प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळाली. वाढलेल्या मागणीमुळे देहविक्री करणाऱ्यांचा व्यवसाय या दरम्यान जोरात सुरू राहिला. एका वृत्तातून आलेली माहिती सांगते की, अतिश्रीमंतांच्या तोडीस तोड वाटण्यासाठी या महिला महागडी फॅशन करताना दिसत आहेत त्याचबरोबर त्यांच्याप्रमाणे श्रीमंत दिसण्यासाठी (Richest) तसे प्रयत्नही करताना दिसत आहेत.
कुठे चालवली जातेय ही 'खास' सेवा?
स्विझर्लेंड येथील दावोसपासून 100 मैलांवर असलेल्या अरगाऊ या भागात ही एस्कॉर्ट सर्व्हिसेस सुरू असल्याचे पाहायला मिळते आहे. या सेवा देणाऱ्या मॅनेजरनं सांगितले की, येथे पहिल्या दिवशीच 11 लोकांचे बुकींग झाले आहे तर 25 लोकांनी सेवेची चौकशी केली आहे. परंतु ही तर आत्ताशी सुरूवात आहे. काहींनी तर आपल्यासोबत आलेल्या कर्मचाऱ्यांसाठीही ही सेवा घेतली आहे.
यातील अनेक महिलांनी आपल्या या अनुभवांबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केले आहे परंतु त्यांनी त्यांच्या ग्राहकांची नावं समोर आणली नाहीत यातून त्यांना त्यांच्यामागे कुठले कायद्याचे लंचाड नकोय, असे डेली मेलच्या पोस्टनं प्रसिद्ध केलं आहे त्यामुळे या अतिश्रीमंतांना घाबरण्याची काळजी नाही असे दिसते आहे.
हेही वाचा - Prince Harry: वयाच्या 17 व्या वर्षी कौमार्य गमावणं... प्रिन्स हॅरीसोबत 'त्या' रात्री काय घडलं?
किती केलं चार्ज?
न्यूयॉर्क पोस्टनं समोर आणलेल्या वृत्तानूसार, ही परिषद सुरू असताना दावोस येथे देहविक्री करणाऱ्या महिला मोठ्या प्रमाणात आल्या आहेत. त्यातील काहींची मुलाखतही यावेळी घेण्यात आली. त्यातून समोर आलेल्या माहितीनुसार, या महिलांनी देहविक्रीसाठी दीड हजार डॉलर (Dollars) चार्जेस घेतले आहेत.