इथियोपिअन एअरलाइन्सच्या विमान अपघाता नंतर चिनच्या सर्व विमान कंपन्यांनी बोईंग ७३७ मैक्स-८ विमान वापरावर निर्बंध लादले आहेत. त्याचप्रमाणे इथियोपिअन एअरलाइन्सची  विमानसेवा बंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी अपघातात एकूण १५७ प्रवाशांनी आपला जीव गमवला आहे. या अपघातात एकही प्रवासी वाचला नाही. मृतांमध्ये ६ भारतीय नागरिकांचा समावेश असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. विमानाने उड्डाण घेताच अवघ्या ६ मिनीटांत अपघातग्रस्त झाले.  
  
चिनच्या नागर विमान प्राधिकरणाने सांगितल्यानुसार, विमान कंपनीने स्थानिक वेळेनूसार ६ वाजता बोईंग ७३७ मैक्स-८ विमान सेवा बंद करण्यात आली. त्याचप्रमाणे विमान सुरक्षा आणि संरक्षणा संबधीत सर्व चैकशी झाल्यानंतर ७३७ मैक्स-८ विमानावर लादलेले निर्बंध हटवण्यात येणार आहेत. प्राधिकरण अमेरिकी विमान नियामक आणि बोईंग यांच्यामध्ये चर्चा होणार आहे. इथिओपियाची राजधानी असलेल्या आदीस अबाबा येथून नैबेरीयेथे उड्डान भरताच विमान कोसळले. अंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डान भरताच विमानाचे कंट्रोल रूमशी संपर्क तुटल्याने अपघात झाला.


याआधी ऑक्टोबर महिन्यात इंडोनेशियाच्या लायन एअर कंपनीच्या विमानाने जकार्ता येथे उड्डान घेतल्यानंतर विमान अपघातग्रस्त झाले. या अपघातात १८९ प्रवासी मृत्यूमुखी पडले. याच दरम्यान सोमवारी अदीस अबाबा येथून बोईंग ७३७ मैक्स-८ विमानसेवा बंद करण्यात आल्या आहेत.