मुंबई : जगात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना अधिक धोका असल्याचं बोललं जात आहे. पण याबाबत अजून ठोस उत्तर कोणाकडेच नाही. अशा परिस्थितीत मुलांसाठी देखील लवकरात लवकर कोरोनाची लस आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. युरोपियन मेडिकल संघाने (EMA) 12 सते 15 वर्षाच्या मुलांसाठी फायजर (Pfizer) च्या वॅक्सीन परवानगी दिली आहे. ही वॅक्सीन १२ ते १५ वर्षाच्या वयोगटातील मुलांना दिली जाणार आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिका आणि जपानमध्ये लसीकरण सुरु
अमेरिका आणि जपानमध्ये मुलांसाठी कोरोनावरील वॅक्सीनेशन ड्राईव्ह सुरु झाली आहे. EMA वॅक्सीन रणनीतीकार मार्को कावालेरी यांनी म्हटलं की, ईएमएच्या ह्यूमन मेडिसिंस कमेटीने शुक्रवारी फायझरच्या वॅक्सीनला 12 ते 15 वर्षाच्या मुलांना मंजुरी दिली आहे.


जर्मनीने देखील 12 वर्षाहून अधिक वयाच्या मुलांना लसीकरणाची घोषणा केली आहे. 7 जूनपासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे. जर्मनीच्या चांसलर एंजला मर्केल यांनी सर्व मुलांना सुरक्षित करण्यासाठी वॅक्सीन देणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. ज्या मुलांनी लस घेतली नसेल त्या मुलांना शाळेत किंवा इतर ठिकाणी जाण्यापासून रोखलं जाईल.