एलियनने मंगळ ग्रहावरुन पृथ्वीवर पाठवलेल्या सिक्रेट मेसेजचा अर्थ कळाला; पहिल्यांदाच सिग्नल डिकोड करण्यात यश
मंगळ ग्रहावरुन एलियनने पाठवलेला सिग्नल डिकोड करण्यात यश आले आहे. एलिययने काय मेसेज पाठवला आहे याचा उलगडा होणार आहे.
Alien Signal : मंगळ ग्रहावर एलियन असल्याचा दावा केला जाता. या अनुषंगाने अमेरिकन अंतराळ संस्था अर्थात नासाने अनेक मोहिमा राबवल्या आहेत. या मोहिमांना मोठं यश आल्याची घडामोड समोर आली आहे. मंगळ ग्रहावरुन आलेला रहस्यमयी सिग्नल डिकोड करण्यात यश आले आहे. युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) च्या ExoMars Trace Gas Orbiter (TGO) ने एलियन मार्फत आलेला सिग्नल पृथ्वीवर पाठवला होता.
अमेरिकन पिता-मुलीच्या टीमने एलियनने मंगळ ग्रहावरुन पृथ्वीवर रहस्यमयी सिग्नल डिकोड केला आहे. यामुळे एलियनने पाठवलेल्या सिक्रेट मेसेजमध्ये काय आहे. याचा उलगडा झाला आहे. केन शॅफिन आणि केली शॅफिन अशी मसेज डिकोड करणाऱ्या पिता आणि मुलीचे नाव आहे.
SETI संस्था, ग्रीन बँक वेधशाळा, ESA आणि INAF यांनी संयुक्तपणे नागरिक वैज्ञानिक स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेत युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) च्या ExoMars Trace Gas Orbiter (TGO) ने एलियन मार्फत आलेल्या सिग्नल डिकोड करण्याचा टास्क देण्यात आला होता. पृथ्वीवर असलेल्या तीन रेडिओ खगोलशास्त्र वेधशाळांनी हा सिग्नल कॅप्चरल केला होता. जगभरातील पाच हजारांहून अधिक नागरिक वैज्ञानिकांनी हा सिग्नल डीकोड करण्याच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता. सर्वजन ऑनलाईनच हे काम करत होते.
अमेरिकेच्या केन आणि केली शॅफिन यांना सिग्नल डीकोड करण्यात यश आले आहे. या सिग्नलमध्ये पांढरे ठिपके आणि रेषांचे पाच गट दिसून येतात. काळा रंगाच्या पृष्ठभागावर हे पांढरे ठिपके आहेत. या ठिपक्यांचा अर्थ म्हणजे पेशींच्या निर्मिती म्हणजेच जीवनाच्या निर्मितीकडे असा काढण्यात आला आहे. डीकोड केलेल्या संदेशात पाच अमीनो ऍसिड असतात, जे सजीवाच्या निर्मीतीत महत्वाची भमिका बजावतात. हे सर्व जैविक आण्विक आकृती आहेत. म्हणजेच जीवन देणाऱ्या अमिनो आम्लांचे आकृतीबंध आहेत असे केन आणि केली यांनी सांगितले.
या ब्लॉक्समध्ये 6, 7, 8 असे पिक्सेलचे अणुक्रम सापडतात. हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन असे आहे. या आकृत्यांमधील रेषा सिंगल आणि डबल बाँड्सपासून बनविल्या जातात. सामान्य अणू आकृती प्रमाणे. ठिपके त्यांना जोडण्याचे काम करतात. असे तर्क मांडले जात आहेत. मात्र, अद्याप या मेसेजचा पूर्ण अर्थ समजू शकलेला नाही.