मुंबई : इस्राईलमध्ये फायझर बायोटेकची लस घेतल्यानंतर 12 हजार 400 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण 1 लाख 89 हजार इस्त्राईलमधील रुग्णांना कोरोनाची लस दिली होती. त्यापैकी 6.6 % जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. १९ डिसेंबरपासून लसीकरण मोहिमेला इस्त्राईलमध्ये सुरुवात झाली आहे. एकूण लोकसंख्येच्या एक चतुर्थांश लोकांचं लसीकरण झालेलं आहे. सध्या इस्त्रायलमध्ये तिसऱ्या टप्प्यातला लॉकडाऊन सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातल्यानंतर विविध देशांमध्ये कोरोनावरील लस शोधून काढली. लसीकरण सुरु झालं आहे. लसी किती प्रभावी ठरेल हे अजून जगासमोर आलेलं नाही. पण लस घेतल्यानंतर ही कोरोना झाल्याने या मोहिमेला धक्का बसण्याची शक्यता आहे. 


लसीकरणाला ईस्राईलने सुरुवात केल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्वत: फायझर कंपनीची लस घेतली होती. फायझर-बायोटेकची लस घेतलेल्या 12,400 लोकांना कोरोना झाल्याने यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. यापैकी 69 लोकांनी दुसरी लस देखील घेतली होती. लस दिल्यानंतर 189,000 लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. ज्यामध्ये हे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 


भारतासह अनेक देशांमध्ये कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात झाली आहे.