Treat Willams Died in Motorcycle Crash: गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ आपल्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारे जगप्रसिद्ध अभिनेते ट्रीट विल्यम्स यांचे अपघाती निधन झाले आहे. त्यांच्या निधनानं हॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. ट्रीट विल्यम्स हे 71 वर्षांचे होते. ग्रेग बेरलॅन्टी यांच्या 'एवरवूड' (Everwood) या ड्रामा सिरिजसाठी ओळखले जातात. या सिरिजमधून त्यांनी डॉ. एन्डी ब्राऊन (Dr. Andy Brown) ही व्यक्तिरेखा साकारली होती. अमेरिकेतील डॉर्सेट (Dorset, VT) येथे मोटरसायकल अपघातात त्यांचे निधन झाले आहे. डेडलाईन या वृत्त संकेतस्थळानं याबद्दलचा रिपोर्ट जाहीर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिपलनं दिलेल्या माहितीनुसार, एका फायर चीफनं वृत्त संकेतस्थळाला सांगितले की संध्याकाळी 5 वाजता हा अपघात झाला. यावेळी अपघातात ट्रीट विल्यम्स यांची मोटारसायकल आणि एक कार यांचा समावेश होता. अंदाजानं कारचा ड्रायव्हर ट्रीट विल्यम्स यांना पाहू शकला नाही. त्यामुळे त्यांनाच या अपघातात दुखापत झाली. त्यांना तातडीनं रूग्णालयात नेण्यात आले. ट्रीट विल्यम्स यांनी 1975 साली चित्रपटसृष्टीत आगमन केले. त्यांना 'हेअर' या चित्रपटासाठी गोल्डन ग्लोबचे नॉमिनेशन मिळाले होते. त्यांनी टेलिव्हिजन सिरिजमधूनही प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.  


ट्रीट विल्यम्स यांनी अनेक चित्रपटांतून कामं केली आहेत. त्यांचा 1981 साली आलेला 'प्रिन्स ऑफ द सिटी' हा चित्रपट प्रचंड गाजला. यासाठीही त्यांना गोल्डन ग्लोबचे नॉमिनेशन मिळाले होते. 2002 सालापासून त्यांनी 'एव्हरवूड' या ड्रामा सिरिजमधून अभिनय केला. या ड्रामा सिरिजसाठीही त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्याचसोबत त्यांनी 'ख्रिसमस हाऊस', 'बियॉड द ब्लॅकबोर्ड', 'सेफ हार्बर', 'चेसिंग द ड्रीम' अशा काही लोकप्रिय चित्रपटांतून त्यांनी काम केलं आहे. 


हेही वाचा - रॅपरनं वाढदिवसाला नग्न स्त्रियांच्या अंगावर सर्व्ह केली सुशी; नेटकरी संतापले


ट्रीट विल्यम्स यानी स्टिवन स्पेल्सबर्ग यांच्या चित्रपटातूनही भुमिका निभावली आहे. त्याचसोबतच 'वन्स अपॉअन अ टाईम इन अमेरिका', 'डेड हिट', 'थिंग्स टू डु इन डेनवर वेन युअर डेड', 'डिप रायसिंग' अशा काही चित्रपटांतूनही त्यांनी भुमिका निभावल्या होत्या. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या आकस्मिक निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी या संदर्भात एक स्टेटमेंट जारी केले आहे. डेडलाईनच्या वृत्तानुसार, त्यात म्हटले आहे की, ''आम्हाला सांगायला अत्यंत दु:ख होते आहे की ट्रीट विल्यम्स याचे अपघाती निधन झाले आहे. तुम्ही कल्पना करू शकता की या बातमीचे आम्हाला प्रचंड प्रमाणात दु:ख झाले आहे. त्यांनी आयुष्यभर त्यांच्या कुटुंबियांवर प्रेम केले. आपलं संपुर्ण आयुष्यही ते अगदी आनंदानं जगले. जे त्यांच्यावर मनापासून प्रेम करतात आम्हाला त्यांच्या सदिच्छा हव्याच आहेत. सोबत या बातमीनं आम्ही सर्वच खचलो आहोत व आमची अशी इच्छा आहे की आमच्या वैयक्तिक दु:खाचा आपण आदर करावा.''