मंगळ ग्रहावर बर्फानंतर आता पाण्याचे स्त्रोत सापडले; प्रचंड वेगाने वाहणाऱ्या नद्यांचे पुरावे उलडगणार जीवसृष्टीचे रहस्य
मगंळ ग्रहावर जीवसृष्टी विकसीत करण्यासाठी वैज्ञानिक अथक परिश्रम घेत आहेत. मंगळ ग्रहावर नदीच्या अस्तित्वाचे पुरावे सापडले आहेत. यावरुन मंगळ ग्रहावर खरचं जीवसृष्टी अस्तित्वात होती का याचे रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे.
Life on Mars : मंगळ(Mars) ग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी वैज्ञानिक अथक परिश्रम घेत आहेत. वैज्ञानिकांच्या अथक परिश्रमांना यश मिळणार आहे. कारण, मंगळावर जीवसृष्टी अस्तित्वात असल्याचे महत्वाचे पुरावे संशोधकांच्या हाती लागले आहेत. मंगळ ग्रहावर बर्फानंतर आता पाण्याचे स्त्रोत सापडले आहेत. NASA च्या पर्सिव्हरन्स रोव्हरने मंगळावरचे काही छायाचित्रे पाठवली आहेत. या छायाचित्रांमध्ये मंगळावर प्रचंड वेगाने वाहणाऱ्या नद्या तसेच मातीचे डोंगर आहेत. हीच छायाचित्रे मंगळावरील जीवसृष्टीचे रहस्य उलगडणार आहेत.
नासाची विशेष मोहिम
मंगळ ग्रहावर जीवसृष्टी निर्माण करण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. यासाठी नासाने विशेष मोहिम हाती घेतली आहे. मंगळ ग्रहावरील जीवनसृष्टीचा शोध घेण्यासाठी मंगळाच्या पृष्ठभूमिवरील खडक व मातीचे नमुने(rock and soil samples)नासा गोळा करत आहे. ‘नासा’चे पर्सिव्हरन्स हे सध्या मंगळ मोहिमेवर आहे. पर्सिव्हरन्स सकाही नमुने गोळा करुन पृथ्वीवर पाठवले आहेत. यातुन अनेक रहस्य उलगडणार आहेत.
प्रचंड वेगाने वाहणारी मंगळग्रहावरील प्राचीन नदी
नासाच्या पर्सव्हरन्स रोव्हरने मंगळावरील प्राचीन नदी डेल्टाचा शोध घेतला. या नदीतून काही नमुने गोळा करण्यात आले आहेत. या नदीतील खडकांमध्ये मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थांचे नमुने सापडले आहेत. प्रचंड वेगाने वाहणाऱ्या नद्यांचे पुरावे उलडगणार जीवसृष्टीचे रहस्य आहेत. ही नदी सध्या कोरडी आहे. मात्र, नदीच्या पृष्ठभागावरील मातीचे परीक्षण करुन पाण्याचा स्त्रोत आणि सूक्ष्मजींवाचा अभ्यास केला जाणार आहे. मंगळ ग्रहावर सापडलेल्या माती आणि दगडाचे नमुने अब्जावधी वर्षांपूर्वी वाहत्या पाण्याद्वारे शेकडो किलोमीटर दूरवरून वाहून आले आहेत. नदीच्या गाळाच्या सापडलेल्या खडकांमध्ये अरोमॅटिक्स नावाचे सेंद्रिय रेणू तसेच चिकणमाती आणि सल्फेट खनिजे आहेत. जेव्हा पाणी खडकाशी संपर्क साधते तेव्हा याप्रकारची जमीन तयार होते, असे संशोधकांचे म्हणणे आहे. यामुळे मंगळ ग्रहावर खरचं जीवसृष्टी अस्तित्वात आहे का का याबाबच खुलासा होण्यास मदत होईल असा दावा शास्त्रज्ञांकडून केला जात आहे.
मंगळ ग्रहावर गोठलेले बर्फ सापडल्याचा दावा
मंगळ ग्रहावर गोठलेले बर्फ सापडल्याचा दावा युरोपियन स्पेस एजन्सीनं केला होता. युरोपियन स्पेस एजन्सीनं सोडलेल्या मार्स एक्स्प्रेसनं काही दिवसांपूर्वी काढलेला एक फोटो एजन्सीने सोशल मिडियावर शेअर केला होता. तब्बल 82 किलोमीटरवर पसरलेले हे हिमविवर म्हणजे दुधावरची साय असल्याचा भास होत होता.