Seoul Halloween Party stamped death : 10 मिनिटांमध्ये होत्यांचं नव्हतं झालं, याचा अनुभव अंगावर काटा आणणारा आहे. हॉलोविन पार्टी...भूताचा गेटअप करुन आलेले लाखो लोक पत्त्याच्या घरासारखे कोसळले, कोलमडले. हॉरर शो पेक्षाही अतिशय भयानक असं हे दृश्य. कोणाच्या समजण्याआत असंख्य लोकांचा बळी गेला होता. धावपळ, आक्रोश आणि आरडाओरड...सर्वत्र मृत्यूचा तांडव...रस्त्यावर खचाखच मृत्यदेह पडले होते. भयानक आणि धक्कादायक मनावर खोलवर रुतून बसलेली ही वेदना...


'मृत्यू'ची हॅलोविन पार्टी! 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मृत्यूचा थरार एका मराठी मुलीने आपल्या शब्दात मांडला आहे. ती तिच्या 8 मित्रमैत्रिणींसोबत दक्षिण कोरियातील त्या भयावह हॅलोविन पार्टीसाठी गेली होती. कोरोनाकाळानंतर दोन वर्षांनी या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहेत. त्यामुळे लाखोच्या संख्येने लोक या हॅलोविन पार्टीत सहभागी झाले होते. मात्र कोणाला माहिती होतं ते मृत्यूच्या जबड्यात जात आहोत ते...


हॅलोविन पार्टीत हॉरर शो


डोळ्यासमोर मृत्यू पाहून आलेल्या या तरुणीने सांगितलं की, अर्ध्या तासात कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी झाली आणि काही क्षणात तिथे मोठा गोंधळ उडाला. ती आणि तिचे मित्र मैत्रिणी त्या गर्दीत अडकले...कसं बसं स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत होते. आजूबाजूला धावपळ, आरडाओरड...एवढी गर्दी की श्वास घेणंही कठीण झालं होतं. ज्यांची उंची कमी त्यांचा जीव गुदमरत होता. त्यावेळी डोळ्यासमोर मृत्यू होता, मला श्वास घ्यायला त्रास होत होता...पण नशीब बलवत्तर तिथे पोलीस आले आणि मला त्या गर्दीतून बाजूला काढलं...काय झालं कसं झालं काही क्षण काहीच कळतं नव्हतं. आपण आहोत की नाही हेही कळायला जरा वेळ गेला. टीव्हीवर पाहणारा हॉरर शो मी प्रत्यक्ष अनुभवला. ही भयावह कहाणी सांगितली आहे सोनाली मदने या मराठी तरुणीने...ती सीओल सिटीमध्ये मास्टर्स करत आहेत. तिने आयुष्यातील हा थरार अनुभव सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर अनेकांना तो वाचून अंगावर काटा येतो आहे.


Exclusive Video : आक्रोश, आरडाओरड..., 



पत्त्यांचं घर कोसळतात तशी...


स्वत: ला कसं बसं त्या गर्दीतून निघून मोकळा श्वास घेण्याचा प्रयत्न करत होती आणि मागे वळून पाहिलं तर एक भयावह दृश्यं पाहून पायाखालची जमीन सरकली...पत्त्यांचं घर कोसळतं तशी माणसं एकानंतर एक कोसळतं होती. अग्निशमन दलाचे जवान पळून पळून प्रत्येकाचं जीव वाचविण्यासाठी सीपीआर देत होते. मात्र या सगळ्या मृत्यू तांडवात 151 जणांचा बळी गेला. झालेल्या गर्दीमुळे 50 हून अधिक जणांना एकाच वेळी हृदयविकाराच्या झटका(Heart Attack) आला.  आनंद साजरा करण्यासाठी जमलेली लोक पण त्या 10 मिनिटाच्या खेळामध्ये सर्वत्र मृतदेहांचा खच पडला होता. सिओलमध्ये घडलेल्या या भयानक घटनेमुळे असंख्य कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळले.