मुंबई : येणारा प्रत्येक दिवस सारखा नसतो याची प्रतिची प्रत्येकाला येत असते. पण, महिलांना ती जरा जास्त प्रमाणात येते. कारण असतं ते म्हणजे मासिक पाळी. महिलांच्या शरीरा होणारे बदल, त्यातच दर महिन्याला येणारी मासिक पाळी आणि त्यामुळं होणाऱ्या वेदना याबद्दल नव्यानं सांगण्याची काहीच गरज नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमच्याआमच्यापैकीही अशा कित्येकजणी असतील ज्यांनी मासिक पाळीदरम्यान त्रास होतो म्हणून कामाला न जाता त्या दिवशी सुट्टी घेण्याचा निर्णय आजवर कित्येकदा घेतला असेल.


मासिक पाळीमध्ये महिलांना होणारा हाच त्रास पाहता आता स्पेनमध्ये अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. इथं महिलांना तीन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे असं म्हणायला हरकत नाही की, स्पेनने केला महिलांचा पेन कमी. 


मासिक पाळीवेळी होणाऱ्या वेदना लक्षात घेत स्पेन सरकारने 3 दिवस सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. स्पेन सरकार पुढील कॅबिनेट बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेणार आहेत. त्यापैकी स्पेनच्या शाळांमध्ये ज्या विद्यार्थींना सॅनिटरी पॅडची आवश्यकता असेल त्यांना सॅनिटरी पॅड उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.


आतापर्यंत कोणत्या देशांनी मासिक पाळीसाठी सुट्टी जाहीर केली?


जापान, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया आणि झांबिया या देशांत मासिक पाळीसाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर आता स्पेनचाही या लिस्टमध्ये समावेश झाला आहे.


मासिक पाळी आणि प्रजनन आरोग्यासाठी एका नवीन पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये गर्भपात करणाऱ्या महिलांना सुद्धा सुट्टी मिळणार असं सांगितलं आहे. तसेच सॅनेटरी पॅड आणि टॅम्पॉनवरील वॅट हटवण्यात येणार आहे. उपेक्षित महिलांना पॅड नि:शुल्क  मिळणार असल्याचे स्पष्ट केलं आहे.