Extra Marital Affair : जर काही कारणास्तव तुमचा तुमच्या जोडीदारापासून घटस्फोट (divorce) झाला किंवा तुम्ही लग्नानंतर दुसऱ्याच्या प्रेमात पडलात (Extra Marital Affair) आणि याच कारणामुळे तुमच्याकडून नोकरी हिरावून घेतली तर? पण असाच एक नियम एका कंपनीने लागू केला आहे. कंपनी आणि कामावरील निष्ठा (Loyalty) वाढवण्यासाठी एका चिनी कंपनीने (chinese firm) आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक अजब नियम जारी केला आहे. या अंतर्गत विवाहित कर्मचाऱ्यांनी विवाहबाह्य संबंध ठेवले आणि कोणी घटस्फोट घेतला असेल तर त्याला कंपनीतून काढून टाकण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका चिनी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम जारी केले आहेत. या अंतर्गत कोणत्याही कर्मचाऱ्याचे विवाहबाह्य संबंध खपवून घेतले जाणार नाहीत. याशिवाय कोणत्याही कर्मचाऱ्याने घटस्फोट घेऊ नये. कंपनीने आपल्या नवीन नियमांमध्ये सर्व कर्मचारी आणि नोकरी अर्जदारांना कडक शब्दात ताकीद दिली आहे की, त्यांनी त्यांच्या कुटुंबाशी एकनिष्ठ राहावे लागेल, तरच त्यांना नोकरी मिळेल अन्यथा नाही.


चीनच्या झेजियांग येथील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी हा आदेश जारी केला आहे. चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, या आदेशावरुन सोशल मीडियावर जोरदार वाद सुरू झाली आहे. चिनी कंपनीने 9 जून रोजी विवाहबाह्य संबंधांबाबत आदेश जारी केला होता. हा नियम कंपनीच्या सर्व विवाहित कर्मचाऱ्यांना लागू झाला आहे. एखाद्या कर्मचाऱ्याने तसे केल्यास त्याला कंपनीतून काढून टाकण्यात येईल, असेही त्यात म्हटले आहे. विवाहबाह्य संबंध, दुसरी पत्नी, घटस्फोट आणि बेकायदेशीर संबंधांपासून दूर राहून तुम्ही एक चांगला कर्मचारी होण्याचा प्रयत्न करायला हवी, अशी अपेक्षा कंपनीने व्यक्त केली. कंपनीकडून अशी घोषणा का करण्यात आली याबाबत अद्यापही माहिती समोर आलेली नाही.


कंपनीने त्यांच्या आदेशात असेही म्हटले आहे की जो कोणी नियमाचे उल्लंघन करेल त्याला कामावर घेतले जाणार नाही. "आम्ही अपेक्षा करतो की सर्व कर्मचार्‍यांनी नियमांचे पालन करावे आणि चांगले कर्मचारी बनण्याचा प्रयत्न करावा, तसेच कुटुंबातील त्यांच्या जोडीदाराशी चांगले राहावे," असे कंपनीने म्हटलं आहे.


दरम्यान, शांघायमधील व्ही अँड टी लॉ फर्मचे वकील चेन डोंग यांनी सांगितले की, चीनच्या कामगार करार कायद्यानुसार, जर कामगार काम करत नसेल तरच त्याला कायदेशीररित्या काढून टाकले जाऊ शकते.