लंडन / नवी दिल्ली : कर्जबुडव्या विजय माल्ल्या आता पुरता अडकलाय. भारताने लंडन महादंडाधिकारी न्यायालयात सादर केलेले पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरलेत. त्यामुळे सीबीआयची न्यायालयातील बाजू भक्कम झालीय. भारताने प्रत्यर्पणाविषयी लंडन न्यायालयात दाखल केलेल्या खटल्याचा आज निर्णय अपेक्षित आहे. त्यासाठी सीबीआयचं पथक लंडनमध्ये आहे. निर्णयाविरोधात ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची मुभा आहे. माल्ल्याच्या प्रत्यर्पणासाठी गेल्या वर्षभरापासून भारताकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, विजय माल्या याला भारतात आणण्यासाठी हालचाली सुरु झाल्यात. आज याबाबत युक्तीवाद झाला. १२ सप्टेंबर नंतर निर्णय द्यायचा की नाही हा निर्णय न्यायाधीश ऐनवेळी घेणार आहेत.  भारतीय बॅंकाची कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केलेय. माल्ल्याच्या प्रत्यार्पणाची हालचाल सुरु झालेय.  लंडन न्यायालयाने तीन आठवड्यात ज्या ठिकाणी माल्ल्याला ठेवण्यात येणार आहे. त्या मुंबईतील आर्थर जेलमधील ठिकाणाचा व्हिडियो सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची सुनावणी आता १२ सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे माल्या भारतात येणे थोडे लांबले आहे.


दरम्यान, माल्लाला आर्थर रोड जेलमध्ये बॅरक क्रमांक १२ मध्ये ठेवले जाणार आहे. दरम्यान, लंडन न्यायालयाने जेलचा व्हिडिओ सादर करण्यास सांगितले आहे. माल्लाला कसे ठेवले जाईल. त्याला काय सुविधा दिल्या जातील हे लक्षात घेऊन न्यालायल माल्याच्या प्रत्यार्णणबाबत निर्णय घेतला जाणार आहे.


माल्याने इंग्लंडमध्येच स्थायिक व्हायचे आहे, असे न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांना सांगितले. माझे सर्व खटले न्यायालयात आहेत. न्यायालय जे बरोबर आहे ते ठरवेल. माल्या २०१५ पासून इंग्लंडमध्ये वास्तव्य करुन आहे.