Indonesia passes criminal code banning sex outside marriage : हल्ली समाजात एक्स्ट्रा मॅरिटयल अफेअरचे (Extra Marital Affairs) प्रकरण वाढले आहेत. विवाह झाल्यानंतरही अनेक जण प्रेमात (Love) पडतात. तर कधी ऑफिस स्पाऊन्च्या (office spouse) नावाखालीही ओपनली एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ठेवतात. अशावेळी विवाह संस्था धोक्यात आली आहे. लोकांचा आता लग्नावरील विश्वास उठत चालला आहे. लग्नाचा पाया म्हणजे विश्वास... आणि जेव्हा हा पाया खोटा ठरतो तेव्हा सगळंच संपतं. अशात एका देशाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 


'या' देशात आता बाहेरचे उद्योग बंद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडोनेशिया या देशाने अतिशय सेक्ससंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या देशामध्ये आता विवाहबाह्य संबंध ठेवल्यास म्हणजेच तुमचं लग्न झालं असेल तर दुसऱ्या मुलीसोबत सेक्स केल्यास तुम्हाला जेलची हवा भोगावी लागेल. इंडोनेशिया सरकारने सेक्ससंबंधात एक कायदा पारित केला आहे. देशाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी या कोडला मंजुरी दिली आहे. या कायद्यातर्गंत विवाहबाह्य संबंध ठेवल्यास एक वर्षाचा तुरुंगवास किंवा मोठा दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे आता इंडोनेशियामध्ये बाहेरचे उद्योग करणाऱ्यांवर चाप बसणार आहे. (extramarital affairs is a crime under the law indonesia passes legislation outlawing sex outside marriage marathi news)



टूरिस्ट इंडस्ट्रीवर परिणाम


सरकारच्या या निर्णयाचा मोठा फटका टूरिस्ट इंडस्ट्रीला बसण्याची शक्यता आहे. कारण या कायद्यातर्गंत हॉटेलवर छापा मारण्यात येणार आहे. जर या नियमाचे उल्लंघन करणारे पर्यटक सापडल्यास त्यांचावरही कारवाई होणार. म्हणून टूरिस्ट इंडस्ट्रीमध्ये भीतीचं वातावरण आहे. तसा तर हा कायदा तीन वर्षांनी लागू होणार आहे, पण त्यापूर्वीच पर्यटक आणि गुंतवणूकदार धास्तावले आहेत. 



गेल्या काही देशांमध्ये मुस्लीमबहुल देशात धार्मिक पुराणमतवाद वाढल्यानंतर बदलांची झलक दिसून येते. या आठवड्यात जकार्तामधील संसदेच्या बाहेर मुख्यत्वेकरून तरुण लोकांच्या अनेक गटांनी या कायद्याला विरोध केला. त्यामुळे नव्या कायद्यांना न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे. 


याठिकाणी सर्वाधिक पर्यटक जातात


इंडोनेशियामध्ये बाली या ठिकाणाला पर्यटकांकडून सर्वाधिक पसंती आहे. त्याशिवाय उबुड, कोमोडो राष्ट्रीय उद्यान, लोंबोक, ब्रोमो टेंगर सेमेरू राष्ट्रीय उद्यान, बुकिट लावंग, फ्लोरेस बेट हे पर्यटनांसाठी प्रसिद्ध जागा आहेत.