Fabrizio Cardinali : फाब्रिझाओ कार्डिनाली...वय वर्ष 72...जिथं लोकं अधुनिकीकरणाच्या नावावर उंची राहणीमान जगणं पसंत करतात तिथं कार्डिनाली सारखी व्यक्ती मात्र गेल्या 50 वर्षांपासून एका जंगलात एकाकी वास्तव्य करतेय. जिथं ना वीज आणि ना गॅस...घरात साधी पाण्याची पाईपलाईन देखील नाही. वाढत्या महागाईनं सारेच जण त्रासलेत पण कार्डिनालींना त्याची जराही चिंता नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इटलीच्या पूर्व ऍड्रियाटिक किनारपट्टीवरील अँकोना जवळील व्हर्डिचियो वाईन कंट्रीच्या टेकड्यांमध्ये त्याचं दगडी फार्महाऊस आहे. पहाटे उठायचं...शेतात काम करायचं...फार्म हाऊसमध्ये पिकवलेला भाजीपाला अन्नधान्य हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन...अगदी घाण्यावर तेल काढण्यापासून मध मिळवण्यापर्यंत सगळी कामं कार्डिनाली स्वत: करतात...आपण जगापासून इतक्या दूरवर आलो आहोत की, लोकांच्या गर्दीत पुन्हा जाण्याची इच्छाच होत नाही, असं कार्डिनाली यांचं म्हणणं आहे.


फाब्रिझाओ कार्डिनाली यांनी सांगितलं की, मला आता जगाचा भाग होण्यात रस नाही म्हणूनच मी सारं काही सोडलं. कुटुंब, माझं विद्यापीठ, माझे मित्र, माझा संघ हे सगळं मी केव्हाच मागे सोडलंय. काहीतरी त्याग करणं म्हणजे खूप काही केलं असं होत नाही. तर काहीतरी मिळवायचं असतं म्हणून तुम्ही त्याग करता. सध्या माझ्याकडे एक कोंबडा, तीन कोंबड्या आणि एक मांजर हेच माझे सोबती आहेत



35 वर्षांचा अग्नीस आणि 46 वर्षांची अँड्रिया कार्डिनाली यांच्या भेटीसाठी इथं नियमीतपणे येतात. कार्डिनाली अधूनमधून मित्रांना भेटण्यासाठी कमी अंतराचा प्रवास करतात. स्थानिकांसोबत कॉफी पिण्यासाठी किंवा डॉक्टरांना भेटण्यासाठी जवळच्या गावात जातात. मात्र त्यांचा बहुतांश वेळ एकाकी जगण्यातच जातो. अर्थात याचा त्यांना अजिबात पश्चाताप नाही. त्यांची जीवनशैली पाहण्यासाठी येणा-या लोकांना ते एकच सल्ला देतात. चांगलं जगायचं असेल तर सगळ्यात आधी तुमच्या हातातला स्मार्ट आधी फोन फेकून द्या.


आजच्या धावपळीच्या युगात कार्डिनालींसारखे अवलिया अभावानेच पाहायला मिळतात. म्हणूनच्या ते इतरांपेक्षा खास ठरतात.